गाझियाबाद : देशात झोमॅटो आणि स्विगी या दोन कंपन्या नेहमी कोणत्या न कोणत्या कारणाने चर्चेत रहातात. मात्र ह्या वेळी ‘zomato’ कंपनी भलत्याच कारणाने चर्चेत आली होती. ‘zomato’कंपनीच्या डिलीवरी बॉयवर मारहाणीचे आरोप करण्यात आले होते. यामुळे या कंपनीवर मोठी टीका झाली होत आहे. तरी दुसरीकडे मात्र  Swiggy कंपनी मोठ्या चर्चेत आली आहे. कारण Swiggy कंपनीत डिलीवरी बॉयवर म्हणून काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याचे मोठे कौतुक होत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मिळालेल्या माहितीनुसार दिल्ली येथे राहाणाऱ्या एका महिलेने स्विगी डिलीवरी बॉय आणि कंपनीच मोठ कौतुक केलंय. त्यांनी सोशल मीडियावर अस लिहिलंय की, मी आणि माझा मित्र गाझियाबादच्या इंदिरापूरममध्ये त्यांच्या कारमध्ये फिरायला गेले होते.


अचानक झालेल्या अपघातात मी आणि माझा मित्र गंभीर जखमी झालो होतो. त्यामुळे आम्ही दोघे आपघातून बाल-बाल बचावलो अशा अवस्थेत स्विगी कंपनीत डिलीवरी बॉय म्हणून काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याने आम्हाला त्यांच्या गाडीत बसवून आमचा जीव वाचवला आणि  त्या गाडीचा पाठलागही सुरु केला.  


डिलीवरी बॉयने मन जिंकले
स्तुती म्हणाली की, खूप पाठलाग करुन देखील आम्ही चालकाला पकडू शकलो नाही. मात्र स्विगी डिलीवरी बॉयने वैशाली येथील आपल्या मित्रांना याबाबत माहिती दिली, त्यानंतर गाडीचा चालक पकडला गेला. नंतर त्या चालकाकडून नुकसान भरपाई देखील घेतली.


प्रशंसा म्हणाली की स्विगीच्या डिलिव्हरी बॉयने तिला खूप मदत केली, आज त्यामुळे आमचा जीव वाचला. शेवटी, त्यांनी असे लिहिले की चांगल्या कामासाठी किंवा लोकांची मदत करण्यासाठी शिक्षण किंवा उच्च पगाराच्या नोकर्‍याची गरज नाही, नैतिकता देखील पुरेशी आहे.