या कंपनीनं ३,९९९ रुपयांमध्ये लॉन्च केला 4G स्मार्टफोन
स्मार्टफोन कंपनी स्वाईप टेक्नोलॉजीनं एलीट 4G हा स्मार्टफोन लॉन्च केलाय.
मुंबई : स्मार्टफोन कंपनी स्वाईप टेक्नोलॉजीनं एलीट 4G हा स्मार्टफोन लॉन्च केलाय. ३,९९९ रुपयांना असलेला हा स्मार्टफोन फक्त फ्लिपकार्टवरच मिळणार आहे. एलीट 4G या स्मार्टफोनला ५ इंचाचा एफडब्ल्यूवीजीए डिस्प्ले देण्यात आला असून यासाठी गोरिला ग्लासचा वापर करण्यात आलाय. स्वाईपच्या या स्मार्टफोनमध्ये ८ मेगापिक्सलचा रेयर तर ५ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा आहे. एलीट 4G काळ्या, ब्राऊन आणि सोनेरी रंगामध्ये उपलब्ध आहे.