Flying Car: आता ट्रॅफिक जॅमला करा बाय बाय, या कंपनीने बनवली हवेत उडणारी कार…
फ्लाइंग कार विषयी बरीच चर्चा सुरू आहे. आतापर्यंत उडणाऱ्या कार फक्त चित्रपटात पाहिल्या आहेत किंवा कल्पना केली आहे. पण हे स्वप्न लवकरच सत्यात उतरणार आहे. जाणून घ्या सविस्तर…
Switchblade flying car :गेल्या अनेक महिनांपासून फ्लाइंग कार विषयी बरीच चर्चा सुरू आहे. आतापर्यंत उडणाऱ्या कार फक्त चित्रपटात पाहिल्या आहेत. मात्र आता तुम्ही प्रत्यक्षात पण उडणारी कार पाहणार आहे. कारण सॅमसन स्काय या कंपनीने Switchblade flying car बाजारात घेऊन आले आहेत. ही कार अमेरिकतील नागरिकांना उपलब्ध होणारी ही पहिली फ्लाइंग कार आहे. कार मार्केटमध्ये येताच सुमारे 2000 लोकांनी ते बुक देखील केले आहे. किंमतीबद्दल बोलायचे झाले तर त्याची किंमत $1.70 लाख (1.35 कोटी रुपये) आहे.
विशेष म्हणजे ही कार आणि विमान असे असणार आहे. या वाहनाचे वर्णन अमेरिकेतील तीन चाकी मोटारसायकल केले आहे. जी कार आकाशात उडू पण शकते आणि रस्त्यावर धावू पण शकते. यात एक चालक आणि एक प्रवासी बसू शकणार आहेत. यासाठी टेक ऑफ आणि लँडिंगसाठी रनवे आवश्यक आहे.
या flying car ला कोण उडवू शकतो?
स्विचब्लेड फ्लाइंग कार मालकांना विमानचालन आणि कार ड्रायव्हिंग लायसन्स आवश्यक आहे. त्यांना विमान परीक्षकाकडून वैद्यकीय तपासणी करावी लागेल. त्याचबरोबर त्यांना विमानाच्या देखभालीसाठी दुरुस्तीचा परवानाही घ्यावी लागेल.