नवी कार विकत घेण्याचा आनंद काय असतो हे काही वेगळं सांगण्याची गरज नाही. प्रत्येक कुटुंबाने आयुष्यात जी काही स्वप्नं पाहिलेली असतात, त्यातील एक स्वप्न स्वत:च्या मालकीची गाडी असणं एक असतं. त्यामुळेच जेव्हा हे स्वप्न पूर्ण होणार असतं, तेव्हा होणारा आनंद गगनात मावेनासा असतो. पण जेव्हा हिरमोड होतो तेव्हा होणाऱ्या वेदनाही तितक्याच असतात. असाच अनुभव बंगळुरुच्या शरथ कुमार यांना आला आहे. शरथ कुमार यांचा नवी कार विकत घेतल्याचा आनंद फार काळ टिकला नाही. शोरुममध्ये त्यांनी कार तपासून पाहिली असता त्यात अनेक त्रुटी असल्याचं त्यांना आढळलं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शरथ कुमार यांनी टाटा नेक्सॉन कार विकत घेतली होती. या गाडीसाठी त्यांना 18.2 लाख रुपये मोजले होते. कार विकत घेतल्यामुळे त्यांना फार आनंद होता. पण जेव्हा ते कुटुंबासह कार घेण्यासाठी शोरुममध्ये दाखल झाले तेव्हा आनंदाचं रुपांतर संताप आणि निराशेत झालं. 


शरथ कुमार टाटा नेक्सॉनच्या Facelift Automatic Petrol Fearless Plus ची डिलिव्हरी घेण्यासाठी पोहोचले होते. पण त्यांनी कारचं निरीक्षण केलं असता त्यात अनेक त्रुटी होत्या. पाण्याने भरलेले हेडलाइट्स, समोरचा बंपर, क्वार्टर पॅनल फ्रेम आणि टेलगेट फ्रेम यांच्यावर स्क्रॅच तसेच निकृष्ट वेल्डिंग आणि अयोग्यरित्या बसवलेले दार रबर बीडिंग अशा अनेक त्रुटी यात होत्या. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

A post shared by Sharath Kumar T (@shras007)


हे सर्व पाहिल्यानंतर शरथ कुमार प्रचंड निराश झाले. प्रेरणा मोटर्समधून त्यांनी कारची डिलिव्हरी घेतली होती. त्यांनी इंस्टाग्रामवर आपली सगळी व्यथा मांडली असून, टाटा मोटर्सचे सर्वात वाईट डिलर्स असल्याची टीका केली आहे. गाडीमधील त्रुटींवरुन डिलिव्हरी केल्याआधी न केलेली पाहणी आणि क्वालिटी कंट्रोल केलं नसल्याचं दिसत आहे. पण या त्रुटी असतानाही कार शरथ कुमार यांच्या नावावर रजिस्टर करण्यात आली होती. 


आपली नाराजी जाहीर केल्यानंतरही शरथ कुमार यांना प्रेरणा मोटर्स किंवा टाटा मोटर्सने परिस्थिती हाताळण्यासाठी पुरेशी पावले उचलली नाहीत असं म्हणणं आहे. त्यांनी दावा केला की, त्यांनी बदली कार किंवा परतावा देण्यात रस दाखवला नाही. त्याऐवजी त्यांनी दोन वर्षांच्या विस्तारित वॉरंटीसह दुरुस्ती केलेले वाहन स्वीकारावे असे सुचवले. यावर तोडगा काढण्यास तयार नसलेल्या कुमार यांनी इंस्टाग्रामवर आपल्या तक्रारी मांडल्या.



कुमार यांनी इंस्टाग्रामला शेअर केलेला व्हिडीओ व्हायरल झाला असून, 6.5 मिलियन लाइक्स मिळाले आहेत. या व्हिडीओवर टाटा नेक्सॉनच्या अधिकृत हँडलवरुन उत्तर देण्यात आलं आहे. त्यांनी माफी मागत पुढील कारवाई करण्यासाठी संपर्क साधण्याचं आवाहन केलं. पण कुमार यांनी आपण नाराज असून आता कोर्टातच भेट होईल असा इशारा दिला आहे.