टाटा Tigor Buzz भारतात लॉन्च, किंमत...
पाहा किंमत आणि फिचर्स...
मुंबई : टाटा मोटर्सने आपली अॅनिव्हर्सरी एडिशन कार Tigor Buzz कार लॉन्च केली आहे. ही कार लिमिटेड एडिशनमध्ये लॉन्च केली आहे. Tigor Buzz ही कार पेट्रोल आणि डिझेल दोन्ही व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहे. एक नजर टाकूयात या कारच्या फिचर्स आणि किंमतीवर...
टाटाने Tigor Buzz एडिशन साठी रेड थीम ठेवली आहे. ग्लॉसी ब्लॅक रुफ आणि याच रंगासोबत मिळता-जुळत्या बाहेरील रियर व्ह्यू मिररसह कारचा प्रमोशनल कलर बेरी रेड आहे. यामध्ये रेड हायलाईटसह स्पोर्टी लूक व्हील कव्हर आहे. कारच्या समोर बेरी रेड ग्रिल हायलाईट्ससह ब्लॅक कलर ग्रिल आहे. तसेच इंटेरियरमध्येही काही अपडेट्स केले आहेत.
Tigor Buzz या कारमध्ये 2-DIN ऑडिओ सिस्टम, AUX-IN, यूएसबी, ब्ल्युटूथ क्नेक्टिव्हिटी, मॅन्युअल एसी सारख्या सुविधा आहेत. कारमध्ये 1.2 लीटर 3 सिलिंडरचं पेट्रोल इंजिन आणि 1.05 लिटर 3-सिलिंडरचं डिझल इंजिन देण्यात आलं आहे. दोन्ही इंजिनमध्ये -स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स देण्यात आला आहे.
टाटा मोटर्समध्ये मार्केटिंग, सेल्स, कस्टमर केअर, बिझनेस युनिटचे हेड एस एन बर्मनने सांगितलं की, हे वर्ष कंपनीसाठी खूपच चांगलं आहे. टिगोर कार लॉन्चिंगमुळे डिमांड वाढली आहे. कंपनीच्या ग्रोथ सोबतच ग्राहकांच्या गरजाही पूर्ण व्हाव्यात अशी आमची इच्छा आहे.
कारची किंमत
Tigor Buzz या कारची किंमत 5.58 लाख ते 6.57 लाख रुपयांदरम्यान आहे. ही कार पेट्रोल आणि डिझेल दोन्ही व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहे. पेट्रोल व्हेरिएंट कारची किंमत 5.68 लाख रुपये आणि डिझेलची किंमत 6.57 लाख रुपये आहे.