मुंबई : टाटा मोटर्स कंपनीने सोमवारी SUV कार हेक्साला बाजारात लाँच केलं. कंपनीने दिल्लीच्या एक्स शोरूममध्ये या कारची किंमत 15.27 लाख रुपये इतकी ठेवली आहे. कंपनीने सांगितलं की, हेक्सा एक्सएम प्लसला इलेक्ट्रिक सनरूफसोबत सादर करण्यात आलं आहे. ही प्रीमिअम लूकची गाडी बाजारात महिंद्रा एक्सयूवी 500 ला टक्कर देणार आहे. 


टाटा सफारीच्या क्षमतेचं इंजिन 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या एससूवी हेक्स XM+ मध्ये इलेक्ट्रिक सनरूफ आहे. यावर कंपनी 2 वर्षांची वॅरंटी देत आहे. ही कार ARIA या प्लॅटफॉर्मवर आधारित असून याचं इंजिन टाटा सफारीसारखं अतिशय ताकदवान आहे. टाटा सफारी स्टॉर्मला कंपनीने जानेवारी 2017 मध्ये लाँच केलं होतं. 



पाहूयात याचे फिचर्स 


कंपनीने एसयूवीला 8 रंगात लाँच केलं आहे. यामध्ये सेंसर कॅमेरा, क्रूझ कंट्रोल, रेन सेंसिंग वायपर, फोल्डेबल एक्सटीरियर मिरर आणि ऑटोमेटिक हँडलँपसोबत खूप गोष्टी दिल्या आहेत. पहिल्यांदा लाँच केलेल्या एसयूवीच्या बेस मॉडेलची नवी दिल्लीत एक्स शोरूममध्ये किंमत ही 14.82 लाख रुपये होती. 


टाटा मोटर्सचे अध्यक्ष एस एन बर्मन यांनी सांगितले की, हेक्सा एक्सएम प्लसला बाजारात आणण्याबरोबरत आम्ही त्या उत्पादनाला विस्तारात बाहेर आणत आहोत. कंपनीने या कारची किंमत 20 टक्के सप्टेंबरमध्ये बुकिंग केली आहे. या दरम्यान कंपनीने 64,520 वाहन बाजारात विकले आहेत. गेल्यावर्षी याच काळात कंपनीने 53,964 इकाइयोंची विक्री केली आहे.