नवी दिल्ली : ऑटो सेक्टरमध्ये (Auto Sector) सुरु असलेल्या अनिश्चितते दरम्यान टाटा मोटर्सच्या (Tata Motors) एमडींनी येणाऱ्या काही दिवसांत फ्यूल व्हीकल (Fuel Vehical) आणि इलेक्ट्रिक व्हीकल (Electric Vehical) एकत्रच पुढे जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. सरकार प्रदूषणाच्या वाढत्या स्तरवर नियंत्रण मिळवण्यासाठी इलेक्ट्रिक वाहनांवर भर देत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इलेक्ट्रिक वाहनांसाठी इलेक्ट्रिफिकेशनचा रस्ता लांब आहे. इलेक्ट्रिक वाहनांच्या चार्जिंग स्टेशनसाठी इंफ्रास्टक्चर तयार करणे अतिशय आव्हानत्मक असल्याचे टाटा मोटर्सच्या एमडींनी सांगितले.



काही महिन्यांपासून जवळपास संपूर्ण ऑटो विक्री, गेल्या १० वर्षांतील सर्वात खालच्या स्तरावर आहे. परंतु, इलेक्ट्रिक वाहनमधील जीएसटी कपात केल्याने उद्योगाला फायदा होईल. इलेक्ट्रिक वाहनांसाठी टाटा समूहासोबत संपूर्ण इको सिस्टम तयार करणार असल्याचे ते म्हणाले.



टाटा मोटर्सने जिपट्रोन (ZIPTRON) टेक्नोलॉजी लॉन्च केली आहे. यात मोटर आणि बॅटरीची ८ वर्षांची वॉरंटी असणार आहे. पुढील वर्षाच्या सुरुवातीलाच जिपट्रोन टेक्नोलॉजीची पहिली इलेक्ट्रिक कार लॉन्च करण्यात येणार आहे.