TATA इलेक्ट्रिक Nano आणण्याच्या तयारीत, काय असेल खासियत जाणून घ्या
TATA Nano EV: टाटा नॅनो लवकरच नव्या अवतारात दिसणार आहे. यावेळी इलेक्ट्रिक वर्जन लाँच केलं जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे कारप्रेमींमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. नॅनोची डिझाईन तसंच ठेवलं जाणून काही गोष्टी बदलल्या जाण्याची शक्यता आहे.
Tata Nano Electric Avatar: टाटानं सर्वात स्वस्त नॅनो कार लाँच केल्यानंतर एकच चर्चा रंगली होती. मोटारसायकल ऐवजी लोकं स्वस्त कार विकत घेतील असा कंपनीचा समज होता. मात्र कंपनीचा हा विचार रुजला नाही. त्यामुळे टाटा नॅनोचं प्रोडक्शन (Tata Nano Production) बंद करावं लागलं. टाटा नॅनो कंपनीने 2008 मध्ये लाँच केली होती. 2018 मध्ये कंपनीने कार उत्पादन बंद केलं होतं. मात्र आता टाटा नॅनो पुन्हा एकदा लाँच करण्याची शक्यता आहे. मात्र यावेळी नॅनो इलेक्ट्रिक अवतारात असणार आहे. नॅनोचा आकार तोच राहील मात्र बाकीच्या गोष्टी बदलल्या जातील, असं सांगण्यात येत आहे.
टाइम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, टाटा नॅनोमध्ये पर्याप्त सुधारणेसह इलेक्ट्रिक वर्जन लाँच केलं जाऊ शकतं. यात सस्पेंशन ते टायर बदलले जाऊ शकतात. सूत्रांनी सांगितले की, कंपनी इलेक्ट्रिक मोबिलिटी सेगमेंटमधील विस्ताराचा भाग म्हणून नॅनो परत आणण्याचा विचार करू शकते. यापूर्वी Electra EV ने कारसोबत रतन टाटा यांचा फोटो शेअर करत लिहिलं होतं की, 'खरंच अभिमानाची गोष्ट आहे की, आम्ही कार रतन टाटा यांना डिलिव्हर केली. त्यांननी ही कार चालवली. त्यासोबत त्यांनी फीडबॅकही दिला.'
बातमीची लिंक: Samsung च्या नव्या तंत्रज्ञानाबाबत उत्सुकता, Finger Print स्कॅनरबाबत नवं अपडेट
दहा नवीन इव्ही लाँच करण्याची प्लानिंग
कंपनीने यापूर्वीच Curvv आणि Avinya सारख्या कॉन्सेप्ट इलेक्ट्रिक कार सादर केल्या आहेत. पुढील 5 वर्षांत 10 इलेक्ट्रिक मॉडेल्स लाँच करण्याचे कंपनीचे उद्दिष्ट आहे. टाटा सन्सचे चेअरमन नटराजन चंद्रशेखरन यांनी 77 व्या वार्षिक बैठकीत सांगितले होते की, कंपनीने आर्थिक वर्ष 2021 मध्ये 5,000 आणि आर्थिक वर्ष 2022 मध्ये 19,500 इव्ही विकल्या होत्या. तसेच चालू आर्थिक वर्षासाठी 50 हजार ईव्हीचे उद्दिष्ट होते. कंपनीने एप्रिल-नोव्हेंबर 2022 या कालावधीत 24,000 हून अधिक ईव्ही विकल्या आहेत.