मुंबई : तुम्ही जर नवीन गाडी घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे. टाटा मोटर्सने एक नवीन कार लाँच केली आहे. बहुप्रतीक्षित NEXON EV PRIME लाँच केली आहे. या कारची वैशिष्ट्य काय आहेत आणि साधारण किंमत काय असेल याबद्दल जाणून घेऊया. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

टाटा मोटर्स ही भारतातील ऑटोमोबाईल कंपन्यांमधील आघाडीची कंपनी आहे. ग्राहकांच्या गरजा ओळखून नवनवीन मॉडेल्स ही कंपनी ग्राहकांसाठी घेऊन येत असते. NEXON EV PRIME ही सुपरडूपर गाडी नुकतीच लाँच करण्यात आली. ही गाडी दिसायला खूप सुंदर आहे. पाहताच क्षणी क्लास असं तोंडातून निघतं. 


या कारमध्ये अनेक अॅडव्हन्स टेक्नोलॉजीचा वापर करण्यात आला आहे. ग्राहकांना या कारमध्ये मल्‍टी-मोड रिजेन, रिजेनवर ऑटोमॅटिक ब्रेक लॅम्‍प अॅक्टिव्‍हेशन, क्रूझ कंट्रोल, इनडायरेक्‍ट टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टिम (आयटीपीएमएस), स्‍मार्टस्विच इंटीग्रेटेड कनेक्‍टीव्‍हीटी वैशिष्‍ट्य आणि 110 सेकंदांचा चार्जिंग टाइमआऊट मिळणार आहे.


 सॉफ्टवेअर अपडेटच्‍या माध्‍यमातून ही नवीन सर्वोत्तम वैशिष्‍ट्ये 22 हजारहून अधिक विद्यमान नेक्‍सॉन ईव्‍ही मालकांना देत आहे. जे ही कार खरेदी करणार आहेत त्यांना 25 जुलै 2022 पासून कंपनीकडून ऑथोराइज्‍ड सर्विस सेंटर्समध्‍ये मोफतपणे पहिले सॉफ्टवेअर अपडेट देण्याची सुविधा देखील उपलब्ध आहे. त्यानंतरचे अपडेट्स स्वखर्चाने अपडेट करावे लागणार आहेत. 


टाटा पॅसेंजर इलेक्ट्रिक मोबिलिटी लि.चे मार्केटिंग, सेल्‍स व सर्विस स्‍ट्रॅटेजीचे प्रमुख विवेक श्रीवत्‍स म्‍हणाले की ''नेक्‍सॉन ईव्‍हीने संपूर्ण देशाचे लक्ष वेधून घेतले आहे. लाँचपासून इलेक्ट्रिक व्हेईकलमध्‍ये नेहमी टॉप मॉडेल म्हणून राहिली आहे.'' 


''६५ टक्‍क्‍यांहून अधिक मार्केट शेअरसह ही ईव्‍ही इच्‍छुकांसाठी डिफॉल्‍ट निवड आहे. नेक्‍सॉन ईव्‍ही प्राइमसह आम्‍हाला आमचे उत्‍पादन ऑफरिंग न्‍यू फॉरेव्‍हरचे धोरण अधिक प्रबळ होण्‍याची अपेक्षा आहे. विद्यमान ग्राहकांसाठी या सॉफ्टवेअर अपडेटसह आम्‍ही ग्राहक टाटा ईव्‍ही मालकीहक्‍क अनुभवाचा भाग म्‍हणून करू शकणा-या अपेक्षांचा नवीन बेंचमार्क स्‍थापित करत आहोत.'' 


ही कार इलेक्ट्रिकवर चालणारी आहे. कंपनीने ही कार 14.99 लाख रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत मार्केटमध्ये लॉन्च केली आहे. कंपनीने एका निवेदनात म्हटले आहे की Nexon EV प्राइमचे हे मॉडेल जुन्या आवृत्तीची जागा घेईल. 


टाटा मोटर्सने सांगितले की Nexon EV प्राइम एका चार्जवर 312 किमी अंतर पळू शकते. कंपनी आपल्या बॅटरी आणि मोटरवर आठ वर्षांची किंवा 1.60 लाख किमीची वॉरंटी देखील असल्याचा कंपनीचा दावा आहे.


साधारण 14.99 ते 17.50 लाख रुपयांपर्यंत या कारची किंमत जाते. वेगवेगळ्या व्हेरिएंटनुसार या कारची किंमत बदलते. तुम्ही जर इलेक्ट्रिक कार घेण्याचा विचार करत असाल तर ही कार सर्वोत्तम पर्याय असल्याचा कंपनीने दावा केला आहे. ग्राहकांना ही तीन रंगात कार उपलब्ध असणार आहे.