नवी दिल्ली : कार विकत घेण्याबद्दल अनेकजणांच्या मनात विचार येतो पण पैशाचा विचार करुन मन मारले जाते. पण कार घेणे हे तुम्हालाही शक्य होणार आहे. पहिल्या नजरेत कदाचित तुम्ही टाटाच्या या ऑफरवर विश्वास ठेवणार नाही पण काही अटींसह हे लागू आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 जर तुमच्या खिशात एक रुपया असेल तर तुम्ही टाटाची कार घरी आणू शकता. एवढेच नव्हे तर फक्त एक रुपया देऊन आपण कारचा विमा काढू शकता. यासाठी 'टाटा मेगा ऑफर'ने 'मॅक्स सेलिब्रेशन ऑफर' सुरू केली आहे. ही ऑफर २५ नोव्हेंबरपर्यंत सुरू राहणार आहे.


'१ रुपयामध्ये कार मिळविण्यासाठी'च्या या ५ गोष्टी 


१) 'या' कार मिळतील


 'एक रुपयात कार घरी आणा'अंतर्गत हेक्सा, टायगर, टिएगो, जेस्ट आणि सफारी, स्टॉर्म घरी आणू शकता.


२) ऑफरची अट


 कारच्या एक्स शोरुमच्या किंमतीवर १ रुपयाच्या डाऊन पेमेंटच्या ऑफर मध्ये मिळणार आहे ही या ऑफरची अट आहे.


३) ऑफर २५ नोव्हेंबरपर्यंत


१ रुपयात विमा ही ऑफर टियागा, टिगोर डिझेल आणि हेक्सा एक्सई वर लागू आहे, ही ऑफर २५ नोव्हेंबरपर्यंत लागू आहे.


४) सवलत 


याशिवाय, हेक्सासवर ७५ हजार,  टिगोरवर २५ हजार, जेस्टवर ५७,५०० आणि  स्टॉर्मवर  ७२,५००  रुपये सवलत आहे.


५) कॉर्पोरेट सवलत


टियागोवर कॉर्पोरेट सवलतही मिळत आहे.  या ऑफरमध्ये कॅश डिस्काउंटसह रोख रु. १ चा विमा आणि एक्सचेंज बोनस समाविष्ट आहेत.