Tata Punch CAMO Edition: सणासुदीचा हंगाम सुरु असताना भारतीय बाजारपेठेत आपली विक्री वाढावी म्हणून Tata Motors कंपनीने सर्वात लोकप्रिय असलेल्या मिनी SUV चं अर्थातच Punch या मॉडेलचं नवं CAMO Edition लॉंच केलं आहे. भारतात खरेदी करता येणाऱ्या सर्वात सुरक्षित कार्सपैकी एक अशी ओळख Tata Punch या कारची आहे. या कारला Global NCAP कडून 5-स्टार सेफ्टी रेटिंग मिळाली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 



Tata Punch CAMO Edition Design


Tata Punch CAMO Edition बाहेरील बाजूने मोहक फॉलिएज ग्रीन कलरध्ये उपलब्ध आहे, तर छतासाठी ड्युअल टोन कलरचा पर्याय (पियानो ब्लॅक व प्रिस्टाइन व्हाइट) आहे. या नवीन मॉडेलसोबत Punch आता नऊ लेटेस्ट कलरच्या पर्यायांमध्ये उपलब्ध होणार आहे. कॅमो एडिशनचा आतील भाग अनोख्या मिलिट्री ग्रीन कलरमध्ये आहे आणि या कारची सीटिंग अपहोल्स्ट्री कॅमोफ्लॉज्ड प्रकारची आहे. कारच्या फेण्डर्सवर अ‍ॅट्रॅक्टिव्ह कॅमो बॅजिंग आहे आणि ती एमटी व एएमटी या दोन्ही ट्रान्समिशन प्रकारांत उपलब्ध होईल.


Tata Punch CAMO Edition Features


Tata Punch CAMO Edition मध्ये 6 स्पीकर, 16 इंच आकाराचा चारकोल डायमंड-कट अलॉय वील, रिवर्स पार्किंग कॅमेरा, अँड्राऑइड ऑटो आणि अ‍ॅपल कारप्लेसोबत 7 इंच आकाराचे इंफोटेनमेंट सिस्टम उपलब्ध आहे. CAMO एडिशनचं दुसरं वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये LED DRLs, टेल लँप, पुश स्टार्ट / स्टॉप बटन, क्रूज कंट्रोल आणि फ्रंट फॉग लँप हे फीचर्स उपलब्ध आहे.


Tata Punch CAMO Edition Engine


Tata Punch CAMO Edition मध्ये 1.2-लिटर, 3-सिलेंडर पेट्रोल इंजिन दिलं आहे. हे इंजिन 6,000 rpm वर 86 PS इतकं जास्तीत जास्त पॉवर आणि 3,300 rpm वर 113 Nm इतकं पीक टॉर्क जनरेट करतं. यासोबत, 5-स्पीड मॅन्यूअल आणि 5-स्पीड ऑटोमॅटिक ट्रांसमिशनचा पर्याय दिला आहे.


Tata Punch CAMO Edition Price


Tata Punch CAMO Edition ची किंमत 6.85 लाख रुपयांपासून सुरु होते. तसेच, बेस मॉडेलची किंमत 5.93 लाख रुपयांमध्ये खरेदी केली जाऊ शकते. आजपासून Tata Motors च्या कोणत्याही अधिकृत डीलरशिपमधून या नव्या एडिशनची खरेदी केली जाऊ शकते.