मुंबई : डीटीएच आणि ओटीटीमध्ये भारताची अग्रेसर कंपनी टाटा स्कायने नवा प्लॅन सादर केला आहे. ७५ रुपयांच्या महिन्याभराच्या पॅकमध्ये चांगली सेवा प्रदान केली जाईल. यासाठी युजर्संना अतिरिक्त इंटरनेट कनेक्शनची आवश्यकता नाही. टाटा स्काय वर्ल्ड स्क्रीन सर्व ग्राहकांसाठी अगदी स्वस्त दरात उपलब्ध आहे. हा कंटेंट फक्त मोठ्या स्क्रीनवर नाही तर मोबाईल, लॅपटॉप यांसारख्या गॅजेट्सवरही उपलब्ध आहेत.


जाहिरातमुक्त ६५० तासांचा कंटेंट उपलब्ध


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

स्कायचे चीफ कंटेंट ऑफिसर अरुण उन्नी यांनी सांगितले की, टाटा स्काय वर्ल्ड स्क्रीनच्या लॉन्चिंगसोबत सिनेमा, टेलिव्हीजन, हॉलिवूड नाही तर जगभरातील स्टोरीज जाहिरातमुक्त पाहायला मिळतील. यात ६५० तासांचा कंटेंट असेल.


पहिल्यांदाच डीटीएच प्लेटफॉर्म जाहिरात मुक्त सेवा प्रदान करत आहे. हे २४ तास चालेल आणि अधिकतर शो असे असतील की भारतातील टी.व्ही. वर उपलब्ध नसतील.  
लवकरच मोबाईल प्रमाणे डीटीएच आणि केबल सेवा पोर्ट करण्यात येईल. यात तुम्हाला कोणतीही सेवा निवडण्याचे स्वातंत्र मिळेल.


हे होतील फायदे


  • दुसऱ्या नेटवर्कमध्ये अगदी सहज पोर्ट होता येईल.

  • पोर्टेबिलिटी आल्यानंतर सर्व्हीस प्रोव्हायडर्समध्ये स्पर्धा वाढेल. याचा थेट फायदा युजर्संना मिळेल.

  • स्पर्धा वाढल्यानंतर कंपन्या नवनव्या ऑफर्स सादर करतील. त्यावर डिस्काऊंट मिळेल.

  • याचा अनुभव नक्कीच चांगला असेल. जर तुम्हाला एखाद्या कंपनीची सुविधा किंवा सेवा न आवडल्यास तुम्ही लगेच पोर्ट करु शकता. त्याचबरोबर युजर्स सजग होतील आणि कंपन्याना युजर्स कायम ठेवण्यासाठी मेहनत घ्यावी लागेल.