Tata Tiago EV:  देशात सध्या इलेक्ट्रिक वाहनांची मागणी वाढली आहे. अशातच अनेक वाहन उत्पादक कंपन्या आपल्या इलेक्ट्रिक कार, बाईक आणि स्कूटर लॉन्च करत आहे. दरम्यान टाटा मोटर्स (Tata Motors) ही देशातील इलेक्ट्रिक फोर-व्हीलर सेगमेंटमधील (electric four-wheeler segment) सर्वात मोठी कंपनी आहे. आपला इलेक्ट्रिक पोर्टफोलिओ वाढवण्यासाठी कंपनी लवकरच Tiago चे इलेक्ट्रिक मॉडेल (Tiago electric model) लॉन्च करणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

Tigor EV ला ग्लोबल NCAP क्रॅश चाचणीमध्ये 4-स्टार सुरक्षा रेटिंग मिळाले आहे आणि Tiago EV देखील खूप सुरक्षित असेल अशी अपेक्षा आहे. किंमतीबद्दल बोलायचे झाल्यास, Tata Tiago EV ची किंमत एक्स-शोरूम 10 लाख रुपयांच्या जवळपास ठेवली जाऊ शकते. 


देशांतर्गत ऑटोमेकरने अधिकृतपणे पुष्टी केली आहे की, सर्व-नवीन Tata Tiago EV 28 सप्टेंबर 2022 रोजी भारतात लॉन्च करण्यात येणार आहे. एकदा लॉन्च झाल्यानंतर ही देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार असू शकते. Tata Tiago ही कंपनीची एंट्री लेव्हल ICE हॅचबॅक आहे.


Tata Tiago EV ही भारतातील पहिली इलेक्ट्रिक हॅचबॅक असेल आणि कंपनीच्या पोर्टफोलिओमध्ये ती Tigor EV च्या खाली असेल. टाटा मोटर्स आपल्या Tiago कारचे इलेक्ट्रिक व्हर्जन बाजारात उतरवणार आहे. जागतिक इलेक्ट्रिक वाहन दिनानिमित्त ही माहिती दिली कंपनीने दिली आहे. कंपनी येत्या आठवड्यात Tiago EV ची किंमत आणि इतर महत्त्वाचे तपशील जारी करण्याचा विचार करत आहे.


वाचा : Baba vanga यांच्या भाकितांमुळे जगला भरली धडकी, कोरोनानंतर 'या' वर्षी येणार आणखी एक धोकादायक महामारी! 


स्वस्त कार येणार


टाटा मोटर्स लवकरच स्वस्त इलेक्ट्रिक कार बाजारात दाखल करणार आहे. टाटा मोर्टर्स पीव्ही बिझनेस युनीटचे एमडी शैलेश चंद्र यांनी ही माहिती दिली. Tigor EV पेक्षा ही कार स्वस्त असेल. Tigor EV ची 12.5 लाखांपासून सुरुवात होते. त्यामुळे हॅचबॅक सेगमेंटमध्ये इलेक्ट्रिक कार उतरवण्याचा कंपनीचा मानस आहे.


50 हजार कार विक्रीचे उद्दिष्ट


टाटा मोटर्सने या आर्थिक वर्षात 50 हजार इलेक्ट्रिक कार विक्रीचे उद्दिष्ट समोर ठेवले आहे.


3 वर्षांत 10 पट वाढ


इलेक्ट्रिक चारचाकी वाहन बाजारात गेल्या 3 वर्षांत 10 पट वाढ झाली आहे. आर्थिक वर्ष 2019 मध्ये 2 हजार ई-कारची विक्री झाली होती. आता त्यात दहा पट वाढ झाली आहे. तसेच किंमतीच्या बाबतीत, Tata Tiago EV ची किंमत 10 लाख रुपये, एक्स-शोरूम असू शकते, ज्यामुळे ती भारतातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार बनली आहे.