Tcl Special Gift: ई कॉमर्स कंपन्यांबरोबरच अनेक दुकानदार व मोठ्या कंपन्याही दिवाळीच्या मुहूर्तावर ग्राहकांसाठी ऑफर्स आणत असतात. TCL ही सुद्धा इलेक्ट्रोनिक्समधील अग्रगण्य कंपनी आहे. कंपीनेनी त्यांच्या काही वस्तूंवर आकर्षक ऑफर्स दिल्या आहेच. त्याचबरोबर 2 कोटींपर्यंतचे गिफ्ट जिंकण्याचीही संधी दिली आहे. कंपनीने दिवाळीच्या सेलअतंर्गत QLED/Mini LED TV  आणि 65 किंवा जास्त इंचाचा टिव्ही खरेदी केल्यास आकर्षक ऑफर्स देत आहेत. जाणून घेऊया सविस्तर


दिवाळी सेल ऑफर


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

TCL चा मेगा दिवाळी सेल देशभरातील ऑफलाइन रिटेल स्टोर, ब्रँड आणि सर्व डिलरशीप स्टोअरवर आयोजित केला गेला आहे. जर तुमच्याकडे कोटक, एयू, आयसीआयसीआय, एसबीआय, एचडीएफसी, फेडरल, आयडीएफसी, डीबीएस, बँक ऑफ बडोदा आणि यस बँकेचे डेबिट किंवा क्रेडिट कार्ड असेल तर तुम्हालाही अतिरिक्त लाभ मिळणार आहेत. नोव्हेंबर अखेपर्यंत हा सेल सुरू असणार आहे. 


TClच्या QLED, Mini LED आणि 4K TV कमी किंमतीत खरेदी केले जाऊ शकतात. जर तुम्ही टिव्ही खरेदी करत असाल आणि या स्पर्धेत सहभागी होत असाल तर युजर्सना 2 कोटींपर्यंतचे स्पेशल गिफ्ट जिंकण्याची संधी मिळणार आहे. TCLच्या 65 इंच टिव्हीबद्दल बोलायचे झाल्यास यात गुगल असिस्टंटदेखील देण्यात आले आहेत. म्हणजेच तुम्ही व्हॉइस कमांडदेऊनही टिव्ही कंट्रोल करु शकता. त्याचबरोबर यात 4K Google TV असून HDR 10 सपोर्ट करतो. यात नेटफ्लिक्स, यूट्यूब, प्राइम व्हिडिओ आणि 7000 + अॅप्स सुरू होतात. या टिव्हीचा रिफ्रेश रेट 60 हर्टजचा असून 2 वर्षांपर्यंतची वॉरंटी देण्यात आली आहे. 


TCL 55 inches 4K Ultra HD Smart QLED Google TV


या टिव्हीवर 2 वर्षांपर्यंतची वॉरंटी देण्यात आली आहे. यात 60 हर्टजचा रिफ्रेश रेट देण्यात आला आहे. तर, याचा साउंड आउटपुट 56 वॅटचा आहे. तर हा टिव्ही डॉल्बी एटमसला सपोर्ट देतो. यात 3 HDMI पोर्ट आहेत. हा गुगल टीव्ही आहे. यात 2 जीबी रॅम आणि 16 जीबी स्टोरेज आहे. यामध्ये  Netflix, Prime Video, Disney + Hotstar अॅप्स आधीपासून देण्यात आले आहेत.