HP layoffs: देशात आणि जगातील अनेक कंपन्यांमधून नवीन नोकरभरती कमी केल्याच्या किंवा स्थगित करण्याच्या बातम्या येत आहेत. याचपार्श्वभूमीवर फेसबुक, ट्विटर, मायक्रोसॉफ्ट अशा दिग्गज कंपन्यांच्या नावांमध्ये आता आणखी एका नावाची भर पडली आहे. लॅपटॉप आणि इलेक्ट्रॉनिक्स निर्मात्या एचपी (HP Inc) कंपनीनं 6 हजार कर्मचाऱ्यांना कामावरुन कमी करण्याचा निर्णय घेतला. एकूण कर्मचाऱ्यांपैकी 12 टक्के कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर गदा येणार आहे. एचपीमध्ये (HP layoff) सध्या 50 हजाराहून अधिक कर्मचारी आहेत. एचपीनं त्यांच्या 2022च्या अहवालादरम्यान कर्मचारी कपातीची घोषणा केली. महागाई, विक्रीत घट आणि मंदीच्या वाढत्या चिंतेमुळे कपातीचा निर्णय घेण्यात आला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

10 टक्के कर्मचारी कामावरून कमी करणार


HP Inc मधील ही कपात त्यांच्या सध्याच्या कर्मचार्‍यांच्या सुमारे 10 टक्के असल्याचे म्हटले जाते. हा कंपनीच्या खर्चात कपात करण्याच्या योजनांचा एक भाग आहे. एचपीची सतत कमी होत चाललेली विक्री आणि अर्थव्यवस्थेच्या चिंतेमुळे कंपनी हे करणार आहे. किंबहुना कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, चौथ्या तिमाहीतील महसुलात 11.2 टक्क्यांनी घट झाली आहे. जी एका वर्षापूर्वी याच तिमाहीत $14.8 अब्ज नोंदवली गेली होती.


वाचा : 'या' फुलाचा हार, गजऱ्यांसाठीच नाही तर, Diabetes ला कंट्रोल करण्यासाठीही वापर, परिणाम दिसेल एकदम झटपट   


एचपी प्रोडक्टच्या विक्रीत घट


कमी झालेली प्रोडक्ट विक्री हे कर्मचारी कपातीमागचे कारण असल्याचे कंपनीने म्हटले आहे. पर्सनल कॉम्प्युटर कंपन्यांना अलीकडच्या काही महिन्यांत मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागले आहे. चौथ्या तिमाहीत आमच्या कॉम्प्युटर विभागाच्या विक्रीत 13 टक्के घट झाली आहे आणि ती 10.3 अब्ज डॉलरवर आली आहे. यामुळे कंपनीच्या एकूण ग्राहक महसुलात वर्षभरात 25 टक्क्यांची घट झाल्याचेही कंपनीने म्हटले आहे.


कंपनीच्या सीईओचे विधान


अस्थिर मॅक्रो वातावरण आणि मागणी कमी झाल्यामुळे गेल्या सहा महिन्यांत कंपनीच्या उत्पादनांची विक्री कमी झाल्याचे एचपी इंक.चे सीईओ एनरिक लोरेस (CEO Enrique Lores) यांनी एका निवेदनात म्हटले आहे.