तुमच्या फोनमध्येही नेटवर्कची समस्या आहे का? मग या 5 मार्गांचा वापर करा
खराब हवामान किंवा सेल टॉवरची कमतरता देखील असू शकतो. ज्यामुळे ही समस्या निर्माण होते.
मुंबई : बऱ्याच लोकांना अनेक प्रयत्न करुन देखील नेटवेर्कशी संबंधीत समस्यांना तोंड द्यावं लागतं. बऱ्याचदा असं की होतं की, फोनमधील नेटवर्क अचानक गायब होतं किंवा बऱ्याचदा प्रयत्न केला तरी फोन लावताना समस्यांचा सामना करावा लागतो. तुम्ही देखील अशा समस्यांना तोंड द्यावा लागला असेल. अशावेळी आपल्याला वाटते की, आपला फोन खराब तर झालेला नाही ना? परंतु प्रत्येक वेळी खराब नेटवर्कचे कारण तुमचा फोन नाही, तर खराब हवामान किंवा सेल टॉवरची कमतरता देखील असू शकतो. ज्यामुळे ही समस्या निर्माण होते. परंतु अशावेळी काय करावे? असा लोकांना प्रश्न पडतो, तर आज आम्ही तुम्हाला काही मार्ग सांगणार आहोत.
फ्लाईट मोड
फ्लाईट मोड हा एक सोपा आणि जलद पर्याय आहे. हा पर्याय 99 टक्के काम करेल. जर तुम्ही अँड्रॉइड वापरकर्ता असाल तर तुम्हाला क्विक सेटिंग्ज पॅनलवर जावे लागेल. येथे तुम्हाला एअरप्लेन मोड आयकॉन मिळेल. त्यावर क्लिक केल्याने, फोन ऑफलाइन मोडमध्ये जाईल आणि नंतर तो बंद करुन सुरू केल्याने तुम्हाला एक चांगले नेटवर्क मिळेल. तर आयफोनमध्ये हा पर्याय तुम्हाला कंट्रोल सेंटरमध्ये मिळेल.
रिस्टार्ट करा
फोन रीस्टार्ट करणे हा देखील एक चांगला पर्याय आहे. संगणकाप्रमाणेच, तुम्ही स्मार्टफोन रीस्टार्ट करून नेटवर्क समस्येचे निराकरण करू शकता. जर तुम्ही अँड्रॉइड वापरकर्ता असाल तर तुम्हाला पॉवर बटण जास्त वेळ दाबून ठेवावे लागेल, त्यानंतर तुम्हाला रीस्टार्ट करण्याचा पर्याय मिळेल. तर आयफोन वापरकर्त्यांना होम बटण दाबावे लागेल. यानंतर तुम्हाला पॉवर स्लाइडर मिळेल, ज्याच्या मदतीने फोन बंद करावा लागेल आणि नंतर तो चालू करावा लागेल.
सिम कार्ड काढा
सिम कार्ड काढणे हा देखील एक चांगला पर्याय आहे. जर तुमच्या फोनला चांगले नेटवर्क मिळत नसेल, तर तुम्हाला स्मार्टफोनमधून सिम कार्ड काढून तो परत ठेवावा लागेल. अशा प्रकारे, जेव्हा तुमच्या फोनमध्ये नेटवर्क परत येईल, तेव्हा ते अधिक चांगल्या स्थितीत असेल.
नेटवर्क सेटिंग्ज
काहीवेळा तुम्हाला चांगल्या नेटवर्कसाठी सेटिंग बदलावी लागेल. तुम्ही Android वापरकर्ता असल्यास, तुम्हाला Settings > General > Reset > Reset Network Settings वर जावे लागेल. पुष्टी केल्यानंतर फोन रीसेट करा. तर आयफोन वापरकर्ते Settings > General management > Reset > Reset network settings करून सेटिंग रीसेट करू शकतात.
सिग्नल बूस्टर
जर वरील सर्व पर्याय काम करत नसेल, तर तुम्ही नेटवर्क बूस्टर वापरून पाहू शकता. सिग्नल बूस्टर तुमचे नेटवर्क सुधारू शकतो. मात्र, त्यांचा वापर भारतात बेकायदेशीर आहे. कारण बूस्टर वापरणारे स्पेक्ट्रम आणि वापरकर्ते त्यांना पैसे देत नाहीत. परंतु अवैध सिंगल बूस्टरच्या मदतीने तुमचे वायरलेस नेटवर्क कव्हरेज सुधारले जाऊ शकते.