Gaming Chipset Mobile: नवीन फोन खरेदी करायचा असेल आणि त्यासाठी चांगल्या ऑफर्सची प्रतीक्षा करत असाल तर तुमच्यासाठी चांगली बातमी आहे. कारण असाच एक स्मार्टफोन Tecno Spark 9 वर बाजारात उपलब्ध झाला असून हा फोन Amazon वर 8000 रूपयांमध्ये खरेदी करण्याची संधी आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अनेकदा स्मार्टफोन खरेदी करतांना पहिले कॅमेराकडे लक्ष जाते. काही लोक बॅटरीकडे विशेष लक्ष देतात. नवीन स्मार्टफोन खरेदी करताना काही खास गोष्टी लक्षात ठेवाव्यात. ज्या स्मार्टफोनसाठी खूप महत्त्वाच्या आहेत. स्मार्टफोन खरेदी करताना फोनची रॅम तपासणे आवश्यक आहे. फोनमध्ये जास्त रॅम असेल तर तो चांगला मानला जातो आणि त्याचा परफॉर्मन्स देखील चांगला होतो. सध्या सर्वत्र 5G ची चर्चा सुरु आहे. अशा परिस्थितीत स्मार्टफोन खरेदी करतांना फोनमध्ये 5G कनेक्टिव्हिटी तपासली पाहिजे. याशिवाय, स्मार्टफोनच्या किमतीची तुलना करणे देखील आवश्यक आहे. अशाच फोन बाजरात उपलब्ध झाला असून  ग्राहकांना मोठ्या सवलतीत Tecno Spark 9 खरेदी करण्याची संधी आहे. ग्राहक निवडक बँक कार्डांसह अतिरिक्त सवलत देखील घेऊ शकतात. इतकेच नाही तर जुन्या फोन देऊन आणखी कमी किमतीत फोन खरेदी करू शकता. 


वाचा: Shubman Gill म्हणता म्हणता 'या' अभिनेत्यासोबत Sara Tendulkar चे फोटो व्हायरल


स्वस्त मस्त गेमिंग फोन 


Tecno Spark 9 भारतात 4GB+64GB स्टोरेजसह बेस व्हेरिएंटसाठी 11,499 रुपयांमध्ये लॉन्च करण्यात आला आहे. मात्र amazon वरती हाच गेमिंग फोन 7,799 रुपयांमध्ये उपलब्ध होईल. यामध्ये रॅम 7GB पर्यंत वाढवता येऊ शकते. 6GB + 128GB स्टोरेजच्या दुसऱ्या वेरिएंटमध्ये, RAM 11GB पर्यंत वाढवता येऊ शकते आणि ती 13,499 रुपयांऐवजी 8,999 रुपयांमध्ये मिळत आहे. 


तसेच टेक ब्रँड टेक्नोनं आज भारतीय बाजारात आपला आणखी एक स्वस्त स्मार्टफोन सादर केला आहे. कंपनीनं Tecno Spark Go 2023 भारतात लाँच केला आहे. हा मोबाइल फोन 13MP Camera, 3GB RAM, MediaTek Helio A22 प्रोसेसर आणि 5,000mAh Battery सारख्या स्पेसिफिकेशन्सना सपोर्ट करतो, जो फक्त 6 हजारांच्या बजेटमध्ये विकत घेता येईल. स्पार्क गो 2023 च्या प्राइस आणि स्पेसिफिकेशन्सची माहिती पुढे देण्यात आली आहे.