Cyber Crime : सायबर गुन्हेगारीच्या (Cyber Attack) आरोपांखाली एका 24 वर्षीय हॅकरला अमेरिकेतील फेडरल जेलमध्ये पाठवण्यात आले आहे. जुलै 2020 मध्ये, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन (joe biden), एलॉन मस्क (joe biden) यांच्यासह जवळपास 130 प्रसिद्ध लोकांची ट्विटर खाती (twitter account) हॅक केल्याप्रकरणी दोषी ठरवलेल्या जोसेफ जेम्स ओ'कॉनरची (Joseph James O'Connor) अखेर तुरुंगात रवानगी करण्यात आली आहे. आरोपी जोसेफने अनेक बड्या व्यक्तींच्या अकाउंटवर सायबर हल्ला केला होता. जोसेफने मे 2023 मध्ये आपला गुन्हा कबूल करत असंख्य हाय-प्रोफाइल ट्विटर अकाऊंटना लक्ष्य केल्याचे मान्य केले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अनेक हाय-प्रोफाइल सोशल मीडिया खात्यांना लक्ष्य करणाऱ्या जोसेफ जेम्स ओ'कॉनरला सायबरस्टॉकिंग आणि कॉम्प्युटर हॅकिंगसाठी मे महिन्यात दोषी ठरल्यानंतर त्याला न्यूयॉर्कच्या फेडरल कोर्टात पाच वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. न्यायालयात, त्याने सांगितले की माझे गुन्हे मूर्खपणाचे आणि निरर्थक आहेत आणि मी सर्वांची माफी मागत आहे.


ओ'कॉनर हा त्याच्या ऑनलाइन हँडल PlugWalkJoe साठी सर्वात जास्त ओळखला जातो. याच समुहाने जुलैमध्ये क्रिप्टोकरन्सी घोटाळा पसरवण्यासाठी अॅपल, बियान्से, बिल गेट्स, जो बायडेन आणि एलॉन मस्क यांच्यासह डझनभर हाय-प्रोफाइल ट्विटर खाती हॅक केली होती. ओ'कॉनर हा याच गटाचा भाग होता. दोषी ठरवल्यानंतर  याच वर्षी एप्रिलमध्ये ओ'कॉनरचे स्पेनमधून अमेरिकेत प्रत्यार्पण करण्यात आले होते.


जुलै 2020 मध्ये, ओ'कॉनरने बायडेन यांचे अकाऊंट हॅक करुन त्याखाली, खालील पत्त्यावर पाठवलेले सर्व बिटकॉइन दुप्पट परत पाठवले जातील. तुम्ही 1,000 डॉलर पाठवल्यास, मी 2,000 डॉलर परत पाठवीन. हे फक्त 30 मिनिटांच्या आत करा आणि त्याचा आनंद घ्या, असा मेसेज लिहिला होता.


दरम्यान, त्यावेळी या सर्व प्रकारानंतर ट्विटरने ओ'कॉनर आणि त्याच्याशी संबधित सर्व अकाऊंट निष्क्रिय केली होती. मात्र आता ओ'कॉनरने सर्व पीडितांना भरपाई देण्यास आणि 794,000 डॉलर पेक्षा जास्त रक्कम जप्त करण्याचे मान्य केले आहे.