iPhone झाला स्वस्त, अवघ्या 20 हजारात घ्या विकत... पाहा मिळतेय ऑफर
iPhone विकत घेणं म्हणजे सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर, पण आता तुम्हीही वापरु शकता आणि तेही स्वस्तात
iPhone Price in India: आयफोन वापरणं म्हणजे स्टेटस समजलं जातं, पण आयफोनची किंमत ऐकली तर सर्वसामान्यांना घाम फुटतो. त्यामुळे सर्वसामान्य माणून इच्छा असूनही आयफोनपासून दूरच असतो. पण तुम्हाला आयफोन घेण्याची खरच इच्छा असेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. नवा स्मार्टफोन (SmartPhone) विकत घेण्याचा विचार करत असाल तर iPhone 11 वर चांगल्या ऑफर सुरु आहेत. तसं पाहिलं ते हे iPhone चं जुनं व्हर्जन आहे. पण आजही या फोनला मागणी आहे. कमी बजेटमध्ये तुम्ही iPhone खरेदी करु इच्छिता तर तुमच्यासाठी हा चांगला पर्याय आहे. शॉपिंग अॅप Flipkart वर चांगल्या ऑफर आहेत.
ई कॉमर्स वेबसाईट Flipkart वर iPhone 11 ची किंमत 37,999 रुपये इतकी आहे. पण तुम्हाला विकत घेण्याची इच्छा असेल तर तोच फोन तुम्हाला 20,499 रुपयांना मिळू शकतो. यावर 17,500 रुपयांचा एक्स्चेंज बोनस मिळत आहे. यासाठी तुम्ही तुमचा जुना स्मार्टफोन एक्स्चेंज करुन नवीन आयफोन विकत घेऊ शकता.
ही ऑफऱ 64GB आणि 128GB व्हेरिएंट फोनवर मिळत आहे. याशिवाय Axis बँकेचं क्रेडिट कार्ड असलेल्या ग्राहकाना अतिरिक्त 5 टक्के डिस्काऊंट मिळत आहे. तसंच तुम्ही EMI चा पर्यायही निवडू शकता. 1,299 रुपयांच्या EMI पासून याची सुरुवातहोते. फ्लिपकार्टवर iPhone 11 सफेद, काळ्या, जांभळ्या, लाल, हिरव्या आणि पिवळ्या रंगात उपलब्ध आहे. एक्सचेंज ऑफर मध्ये तुम्ही iPhone 11 विकत घेणार असाल तर तुमचा स्मार्टफोनची स्थितीही चांगली असावी हे लक्षात असू द्या.
Apple iPhone 11 मध्ये तुम्हाला 6.1-inchचा लिक्विड रेटिना LCD HD डिस्प्ले मिळतोय. यात A13 Bionic चिपसेट आहे. फोनला 18W चा वेगवान चार्जिंग सपोर्ट आहे. पण फोनसोबत तुम्हाला चार्जर मिळणार नाही. iPhone चा मुख्य कॅमेरा 12 MP वाईड लेंसचा आहे. तर दुसरा कॅमेरा 12 MP अल्ट्रा वाइड लेंस आहे. फ्रंट कॅमेराही 12 MP लेंसचा आहे.
फ्लिपकार्टवर iPhone 13 सुद्धा तुम्ही विकत घेऊ शकता. या फोनवर 17,500 रुपयापर्यंत एक्सचेंज ऑफर आहे. याची मूळ किंमत 62,999 इतकी आहे. ऑफर नंतर iPhone 13 तुम्ही 45,499 रुपयात खरेदी करु शकता.