मुंबई : जवळपास प्रत्येक दिवशी एक-एक नवीन अॅप युझर्ससमोर दाखल होत असतात. काही वेळेला आपण एखादा अॅप इन्स्टॉल करतो आणि नंतर पुन्हा अनइन्स्टॉल करतो. पण हेच अॅप काही वेळेला धोकादायक ठरू शकतात. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कुठल्याही चुकीच्या अॅपमुळे आपल्या फोनमधला डाटा चोरी होऊ शकतो. त्यामूळेच गूगलने आपल्या येणाऱ्या नव्या अँड्राईड फोनमध्ये एक नवीन फीचर समाविष्ट केलाय. Google Play Protect नावाचा हा फीचर युझर्सला धोक्याची सूचना देऊ शकेल... इतकंच नाही तर तुमचा फोन हरवलाच तर फोनमधला डाटा तुम्हाला फोनमधील डाटा डिलीटही करता येऊ शकेल.


हा अॅप गूगल मोबाईल सर्विस ११ किंवा त्याच्याहून मोठ्या व्हर्जनच्या अॅन्ड्रॉईड डिव्हाइसवर काम करेल. याला गुगलनं I/O २०१७ डेव्हलपर कॉन्फरन्समध्ये सादर केलंय. या अॅपमुळे तुमचा फोन ऑटोमॅटिक स्कॅन होईल. तसंच यामुळे मालवेयर्सचीही माहिती मिळू शकेल.  


कसे कराल अनेबल 


हा कुठलाही अॅप नाही, त्यामूळे हा प्लेस्टोअर वर उपलब्ध होणार नाही... तर याचं एक वेगळं पेज आहे, त्यावर याची सगळी माहिती उपलब्ध आहे. या पेजवर जाण्यासाठी सेटींगमध्ये जाऊन 'गूगल'वर टॅप करा. तिथे 'सिक्यूरिटी' हा ऑप्शन दिसेल त्यावर टॅप करा. त्यानंतर 'व्हेरिफाय अॅप'वर क्लिक करा. मग या सर्व्हिसला तुम्ही आपल्याला हवं तसं अनेबल किंवा डिसेबल करू शकाल.


मोबाईल हरवल्यानंतर...


या फीचरला 'अनेबल' केल्यास पुढच्या वेळेस कुठलाही नवीन अॅप इन्स्टॉल केला की त्याला स्कॅन केल्यावर तूमचा मोबाईल सुरक्षित आहे की नाही, तसेच तुमचा मोबाईल हरवला तर तुमच्या मोबाईलचा पूर्ण डाटा डिलीट करण्याचेही ऑप्शन देतात, त्यासाठी तुम्हाला गूगलवर जाऊन अँड्राईड डिव्हाइस मेसेंजरवर जावं लागेल. तिथे तुमचे जीमेल अकाउन्ट लॉग इन केल्यावर तुम्हाला तुमच्या डिव्हाइस लोकेशन माहिती मिळेल. यावरूनच तुम्हाला तुमचा फोन लॉक किंवा मोबाईल डाटा डिलीट करता येईल.