कॅबमध्ये कोणत्या वस्तू विसरल्या जातात? या शहरात सर्वाधिक विसरभोळे, Uber ने जाहीर केली मनोरंजक यादी
Uber Lost and Found Index: उबेर कॅबने नुकतीच एक यादी जाहीर केली आहे. ही यादी जितकी मनोरंजक आहे तितकीच थक्क करणारी आहे. देशातील मोठ्या शहरात सर्वाधिक विसरभोळे असल्याचंही या यादीतून समोर आलं आहे.
Uber Lost and Found Index: टॅक्सी - कॅबमध्ये बसल्यानंतर आपण लवकर पोहोचण्याच्या नादात किंवा आपल्याच विचारात असल्याने अनेकवेळा आपल्या हातातल्या वस्तू कॅबमध्येच (CAB) विसरतो. विसरलेल्या वस्तूंमध्ये सर्वाधिक पर्स, बॅग किंवा मोबाईल फोनचा समावेश असतो. याचसंदर्भात उबेर कॅबने (Uber) एक यादी जाहीर (Lost and Found) केली आहे. ही यादी जितकी मनोरंजक आहे तितकीच थक्क करणारी आहे. देशातील लोकसंख्येतील एक मोठा हिस्सा विसरभोळा (Forget) असल्याचं या यादीतून समोर आलं आहे. कॅबमध्ये घड्याळ, चष्मा, पाकिट विसरण्याबरोबरच महागड्या वस्तूही विसरण्याही अव्वल नंबर आहेत.
कॅबमध्ये यावेळी विसरतात वस्तू
उबेरने जाहीर केलेल्या यादीनुसार त्यांच्या एकुण ग्राहकांपैकी बहुतांश ग्राहक (Customer) हे संध्याकाळी सात वाजल्यानंतर कॅबमध्ये वस्तू विसरतात. यातही विकेंडला सर्वाधिक लोकं कॅबमध्ये सामान विसरुन निघून जातात.
दिल्ली नंबर वन
कॅबमध्ये वस्तू विसरण्यामध्ये देशाची राजधानी अर्थात दिल्ली (Delhi) अव्वल क्रमांकावर आहे. त्यानंतर देशाची आर्थिक राजधानी समजल्या जाणाऱ्या मुंबईतील (Mumbai) लोकांचा नंबर लागतो. विसरभोळ्या लोकांच्या यादीत हैदराबाद तिसऱ्या तर बंगळुरु चौथ्या क्रमांकावर आहे.
सर्वाधिक विसरल्या जाणाऱ्या वस्तू
कॅबमध्ये सर्वाधिक विसरल्या जाणाऱ्या वस्तूंमध्ये मोबाईल, कपडे, लॅपटॉप, पाकिट, छोटी हँगबॅग, हेडफोन, दागिने, चावी आणि पुस्तकं या वस्तूंचा समावेश आहे.
महागड्या वस्तूंचाही समावेश
उबेरने जाहीर केलेल्या यादीत काही वस्तू अशा आहेत ज्या कदाचितच विसरल्या जातील. पण काही महाभाग असेही आहे जे या वस्तू कॅबमध्ये विसरत असल्याचंही कंपनीचं म्हणणं आहे. इंडक्शन स्टोव्ह, वेस्टर्न कमोड, प्रिंटेड दुपट्टा, दूधाची पिशवी, पडदे, झाडू अशा वस्तू घेऊन लोकं कॅबमध्ये बसतात पण उतरताना त्या घ्यायला विसरतात. उबर कॅबमध्ये आयफोन आणि अँड्राईड फोनही लोकं विसरतात.
कंपनीने केलेल्या दाव्यानुसार सर्वात मजेशीर गोष्ट म्हणजे शनिवारी सर्वाधिक वस्तू कॅबमध्ये विसरल्या जातात. यातही संध्याकाळी सात वाजल्यानंतर लोकं जास्त विसरभोळे होतात.
विसरलेल्या वस्तू कशा मिळवाल
कंपनीने कॅबमध्ये विसरलेल्या वस्तू कशा मिळवाल याची माहितीही दिली आहे. कंपनीचं अॅप उघडून त्यातील मेन्यू बारमध्ये जावं. त्यानंतर 'Your Trips'चं ऑप्शन निवडा. त्यानंतर 'Find lost item'चा ऑप्शनवर क्लिक करा. पुढे 'Contact driver about a lost item'वर क्लिक करा आणि त्या कॅबच्या चालकाशी संपर्क साधण्यासाठी आपला मोबाईल नंबर नोंदवा. त्यानंतर त्या चालकाशी संपर्क साधून आपण आपली विसरलेली वस्तू मिळवू शकता.