मुंबई :  Appleने गेल्या वर्षी आयफोन 12 सीरीजचे 4 आयफोन बाजारात आणले होते. यात आयफोन 12 मिनी, आयफोन 12, आयफोन 12 प्रो आणि आयफोन 12 प्रो मॅक्सचा समावेश आहे. या सर्व फोनपैकी, आयफोन 12 मिनी हे एकमेव डिव्हाइस होते ज्याला लोकांनी पसंत केला नाही. हे देखील खरे आहे की, आयफोन SEच्या दुसर्‍या जनरेशननंतर आयफोन 12 मिनीला लवकरच बाजारात आणले गेले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ट्रेंडफोर्सच्या अहवालावरानुसार, Appleने आयफोन 12 मिनीच्या प्रोडक्शनवर बंदी घातली आहे. हा स्मार्टफोन आता त्यांच्या लाइफ सायकलच्या अंतापर्यंत पोहोचला आहे. परंतु हा फोन अद्याप Appleच्या वेबसाइटवर उपलब्ध आहे आणि जोपर्यंत या फोनचा साठा कंपनीकडे आहे, तोपर्यंत कंपनी त्याची विक्री केली जाईल.


ट्रेंडफोर्सचा अहवाल समोर


ट्रेंडफोर्सने अहवालात म्हटले आहे की, Apple त्याच्या बाकी तीन नॉन मिनी मॉडल्सवर लक्ष केंद्रित करेल आणि त्यांची विक्री वाढवेल. जेव्हा कंपनीला आयफोन 12 मिनी विक्रीचा रिपोर्ट मिळाला तेव्हा या फोनने त्यांना निराश केले.


आयफोन 12 मिनी हा एक परवडणारा फोन आहे आणि गेल्या वर्षी लॉन्च झालेल्या आयफोन 12 सीरीजमधील हा फोन सर्वात लहान, बारीक आणि हलका 5G फोन आहे.  हा फोन 2020 च्या सुरूवातीला लॉन्च करण्यात आला होता. आयफोन 12 मिनीने Appleच्या एकूण विक्रीपैकी केवळ 20 टक्केच योगदान दिले आहे.


जरी आयफोन 12 मिनीने चांगले प्रदर्शन केले नसले तरी, एक गोष्ट निश्चित आहे की, Apple आयफोन 12 मिनीची आणखी एक आवृत्ती आणू शकतो, जी आयफोन 13 सीरीजमध्ये येईल.


परंतु या फोनसाठी आणखी काही महिने थांबावे लागणार आहे. आयफोन 13 ची सिरिज सप्टेंबर महिन्यात हा फोन बाजारात आणला जाईल. या वेळी कंपनी आपल्या स्मार्टफोनवर जास्त लक्ष केंद्रित करणार आहे.