Technology : आपल्याला शरीरात पाठीच्या मणक्याला खूप महत्व आहे. मणक्याला (Spine) इजा झाली किंवा मणका कमकवूत झाला तर त्या व्यक्तीला अपंगत्व (Disability) येतं, चालणंही मुश्किल होऊन बसतं. मात्र आता काळजी करण्याचं कारण नाही. पाठीचा कणा तुटला तरी त्या व्यक्तीला चालता येऊ शकेल. हे आम्ही म्हणत नाहीये तर स्वित्झर्लंडच्या (Switzerland) संशोधकांनी याबाबत एक नवीन तंत्रज्ञान (New Technology) विकसीत केलंय. ज्यामुळे एका अपंग व्यक्तीला आता चालता येणं शक्य झालंय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नेदरलँड्समधील गर्ट ओसकाम (Gert Oskam) या 40 वर्षीय व्यक्तीचा बारा वर्षांपूर्वी बाईक अपघात झाला अपघातामुळे त्यांना चालता येत नव्हतं किंवा उभंही राहता येत नव्हतं. मात्र वायरलेस डिजिटल ब्रिज तंत्रज्ञानामुळे (Wireless Digital Bridge Technology) मेंदू आणि पाठीचा कणा यांच्यातलं तुटलेलं कनेक्शन पूर्ववत करण्यात संशोधकांना यश आलं आणि ओसकाम पुन्हा पूर्वीसारखे हिंडू-फिरू लागलेत. 


वायरलेस डिजिटल ब्रिज तंत्रज्ञान मेंदू आणि मणक्याच्या दरम्यान इंटरफेस म्हणून कार्य करतं. काही वेळा पाठीच्या कण्याला किंवा मेदूला झालेल्या दुखापतीमुळे दोघांमधील संपर्क तुटतो. त्यामुळे पायावर उभं राहण्याची आणि चालण्याची ताकद कमी होते. नव्या तंत्रज्ञानामुळे मेंदू पाठीच्या मणक्याच्या भागात संदेश पाठवतो ज्यामुळे हालचाल करता येणं शक्य होतं. 


आरोग्य क्षेत्रासाठी ही निश्चितच क्रांतीकारी बातमी आहे. हे तंत्रज्ञान मणक्याच्या विकारामुळे अपंगत्व आलेल्या लोकांसाठी वरदान ठरेल अशी आशा करायला हरकत नाही. 


बहुतांश लोकांमध्ये मणक्याचा आजार
सध्याच्या काळात बहुतांश लोकांना मणक्याच्या आजाराने ग्रासलं आहे. यामागचं महत्त्वाचं कारण म्हणजे 80 टक्के लोकांची कामं ही बसून करावी लागतात. सरकारी कार्यालयं, बँक, आयटीमध्ये काम करणारे कर्मचारी हे दिवसातले जवळपास 8 ते 10 तास सलग बसून कमा करतात. त्यामुळ हळुहळु पाठ आणि मणक्याच्या तक्रारी उद्भवतात. 


विशेषत: लठ्ठ व्यक्ती आणि व्यायाम न करणाऱ्या लोकांमध्ये मणक्याचा त्रास जास्त प्रमाणात बळावू शकतो. मणक्याच्या दुखण्याने डोकं वर काढलं की आरोग्याच्या इतरही समस्या उद्भवतात. एकाच स्थितीत बसल्याने पाठदुखी, सांधेदुखी, डिक्स प्रोलॅक्स अशा अनेक समस्या निर्माण होतात. यामुळे पायांचे, खांद्याचे, खुभ्याचे दुखणं वाढण्याची शक्यता असते. मणक्यातील पाणी कमी झाल्यानेही आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात. सांध्यावर ताण येणं, पाठदुखी अशा समस्या निर्माण होण्याची शक्यता असते. त्यामुळे नियमित व्यायाम करणे आणि बसण्याच्या पद्धतीकडे लक्ष देणे या गोष्टी आवर्जून करायला हव्यात.