Reliance Jio Recharge Plan: रिलायन्स जिओ ही देशातील सर्वात आघाडीची टेलिकॉम कंपनी आहे. देशभरात जिओचे (Jio Plan) करोडो युजर्स आहेत. रिलायन्स जिओने इंटरनेट क्षेत्रात क्रांती घडवली असून देशातील शहरा-शरहात गावा-गावात जिओमुळे इंटरनेट पोहोचलं आहे. आपल्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी जिओने आकर्षक प्लान उपलब्ध करुन दिले आहेत. यात युजर्सना वेगवेगळ्या सुविधा मिळतात.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रिलायन्स जिओचा 319 रुपयांचा प्लान
रिलायन्स जिओने आता एक असा प्लान आणला आहे, जो युजर्ससाठी केवळ आकर्षकच नाही तर अनेकदृष्ट्या फायदेशीर ठरणारा आहे. जिओचा 319 रुपायांचा प्लान सध्या युजर्समध्ये चांगलाच लोकप्रिय ठरत आहे. या प्लानमध्ये युजर्सना पूर्ण महिन्यांचा रिचार्ज दिला जातो. म्हणजे या महिन्याच्या 3 सप्टेंबरला 319 रुपयांचा रिचार्ज केल्यास पुढच्या महिन्याच्या म्हणजे 3 ऑक्टोबरला रिचार्ज करावा लागेल. हा प्लान संपूर्ण महिन्याचा आहे. या प्लानमध्ये युजर्सना दररोज 1.5 डेटा वापरण्याची सुविधा मिळते.


यासोबतच अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा दिली जाते. म्हणजे पूर्ण महिनाभर कोणत्या नेटवर्कवर पाहिजे तितका वेळी कॉल करुन बोलू शकता. शिवाय या प्लानमध्ये दररोज 100 SMS पाठवण्याची सुविधा देण्यात आली आहे. पण याचे फायदे इथेच संपत नाहीत. या प्लानमधअये युजर्सना जिओ टिव्ही, जिओ सिनेमा आणि जिओ क्लाऊडचं फ्री सब्सक्रिप्शन मिळणार आहे. 


तुम्हाला 319 रुपयांचा हा प्लान रिचार्ज करायचा असल्यास जिओची वेबसाईट MyJio अॅप किंवा इतर यूपीआय अॅप्स म्हणजे गूगल पे फोन पेवरुनही रिचार्ज करु शकता.