Mobile News : सध्याच्या जमान्यात मोबाईल वापरणं ही गरज बनलंय, इतकंच नाही तर मोबाईल कितेक्यांच्या रोजगाराचं साधनही बनलंय. मोबाईल म्हणजे आपल्या दैनंदिन गरजांचा एक भागच बनलंय. त्यातही आज प्रत्येकाच्या हातात आपल्याला स्मार्टफोन दिसतात.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आजच्या स्मार्टफोनच्या युगात रोज अनेक स्मार्टफोन लॉन्च होत असतात. या स्मार्टफोनच्या किंमतीही अगदी 10 हजारापासून लाखांपर्यंत असतात. 


अनेकांना वेगवेगळ्या गोष्टींचा छंद असतो. महागडे गॅजेट्स, लक्झरी कार्स असे महागडे शौक काही असतात, तर काहींना महागडे फोन वापरण्याची आवड असते. आता तुम्ही म्हणाल महागातला महाग फोन कितीला असेल?  मात्र जगातील सर्वात महाग स्मार्टफोनची किंमत ऐकल्यावर तुम्हाला धक्काच बसेल. आपण जाणून घेऊनय जगातल्या 5 महागड्या फोनच्या किंमती.


1. Caviar iPhone 12 Pro Pure Gold
जगातील सर्वात महागड्या फोनपैकी एक आहे Caviar iPhone 12 Pro. हा फोनचे मर्यादित प्रकार तयार केले गेले आहेत, ज्याची किंमत $122,000 आहे, ज्याची भारतीय किंमत जवळपास 90 लाख इतकी आहे. त्यावरील कर आणि शुल्कामुळे भारतात त्याची किंमत आणखी वाढू शकते. या फोनमध्ये 18 कॅरेट शुद्ध सोनं आणि हिऱ्यांनी डिझाईने करण्यात आलं आहे. 



2. Galaxy S21 Ultra
Caviar ने लॉन्च केलेला आणखी एक महागडा स्मार्टफोन Galaxy S21 Ultra Caviar. या फोनचे लिमिटेड एडिशनच आहेत. यात सोनं, हिरे, टायटॅनियम आणि शुद्ध लेदरचा वापर करण्यात आला आहे. लक्झरी सॅमसंग S21 अल्ट्राचा मागील भाग टायटॅनियमचा बनलेला आहे. या फोनच्या 128GB मॉडेलची किंमत $20,000 म्हणजेच भारतीय मुल्यात 14.5 लाख रुपये इतकी आहे.



3.Goldvish Le Million
Goldwish Le Million हा स्वीडिश कंपनी Goldvish ने बनवलेला आणखी एक सुपर महागडा फोन आहे.  त्याची किंमत भारतीय मुल्यात जवळपास 7.7 कोटी रुपये आहे. 2006 मध्ये हा फोन अधिकृतपणे गिनीज बुक ऑफ रेकॉर्डने जगातील सर्वात महाग फोन म्हणून घोषित केला होता. या स्मार्टफोनचे आतापर्यंत केवळ तीनच एडिशन बनवण्यात आले. त्यामुळे ज्याने तो विकत घेतला तो खरोखरच सर्वात श्रीमंत आहे असं म्हणायला हरकत नाही. Le Million मध्ये 1,20000 हिऱ्याचे तुकडे तसंच अस्सल लेदरबॅकने सुशोभित केलेली 18 कॅरेट सोन्याची बॉडी आहे.



4. Gresso Luxor Las Vegas Jackpot
ग्रेसो लक्सर लास वेगास जॅकपॉट या स्मार्टफोनची किंमत 7.1 कोटी रुपये आहे. Le Million चा लूक सध्याच्या स्मार्टफोन्सच्या ट्रेंडपेक्षा अगदी वेगळा आहे. जॅकपॉटचा लूक अधिक वैशिष्ट्यपूर्ण आणि ट्रेंडी आहे. यात 45.5 कॅरेट वजनाचे विविध ब्लॅक डायमंड आहेत. स्मार्टफोनची फ्रेम 180 ग्रॅम सोन्याने मढलेली आहे, तर मागील भाग 200 वर्ष जुन्या आफ्रिकन ब्लॅकवुडने मढवलेला आहे.



5. Diamond Crypto Smartphone
जगातील सर्वात महागड्या फोनपैकी एक आहे डायमंड क्रिप्टो स्मार्टफोन, जो ऑस्ट्रियन ज्वेलर पीटर एलिसन यांच्या सहकार्याने JSC Ancourt नावाच्या रशियन फर्मने बनवला आहे. नावाप्रमाणेच, Nokia Classic E51 सारखा दिसणार या फोनची कडा 50 हिऱ्यांनी सजवण्यात आली आहे आणि यात पाच निळे हिरे बसवण्यात आले आहेत. यात प्लॅटिनम बॉडी आहे, तर नेव्हिगेशन की आणि लोगो 18 कॅरेट सोन्यात आहेत आणि त्याची किंमत 9.3 कोटी रुपये आहे.