सिंगल चार्जमध्ये धावणार 375 किलोमीटर, भारतातली सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार
भारतात लवकर लॉन्च होणार या इलेक्ट्रिक कार
मुंबई : २०२१ हे वर्ष भारतीय ऑटोमोबाईल क्षेत्रासाठी खूप खास ठरणार आहे. कारण यावर्षी काही सर्वोत्कृष्ट इलेक्ट्रिक कार बाजारात येणार आहेत. आतापर्यंत भारतात उपलब्ध असलेल्या बहुतांश इलेक्ट्रिक कारची किंमत सर्वसामान्यांच्या बजेटपेक्षा थोडी जास्त असू शकते, अशा परिस्थितीत वाहनधारक आता अशा इलेक्ट्रिक मोटारी घेऊन येत आहेत जे उत्तम रेंज देतील तसेच परवडणाऱ्या देखील असतील. आज आम्ही तुम्हाला अशाच प्रकारच्या आगामी इलेक्ट्रिक कारंबद्दल सांगणार आहोत ज्या येत्या काही महिन्यांत भारतात लॉन्च केल्या जाऊ शकतात.
Strom R3
Strom R3 ही एक थ्री-व्हीलर इलेक्ट्रिक कार आहे. ज्यामध्ये ग्राहकांना 2-डोर, 2-सीट्स आणि एक मोठी सन रूफ दिली जाणार आहे. या कारची किंमत 4.5 लाख रुपये असेल. भारतात मिळणारी ही सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार असणार आहे. यामध्ये लिथियम-आयन बॅटरीचा वापर केला आहे. जी 1 लाख किलोमीटर किंवा 3 वर्षाच्या वॉरंटीसह बाजारात उतरवली जाणार आहे. कंपनीने 10,000 रुपये टोकन अमाउंटसह या कारची बुकिंग सुरु केली आहे. ही भारतातील सर्वात स्वस्त कार असणार आहे. ही इलेक्ट्रिक कार सिंगल चार्जमध्ये 200 किलोमीटर पर्यंत धावू शकणार आहे.
Mahindra eXUV300
Mahindra eXUV300 ची ही कार सिंगल चार्जमध्ये 375 किलोमीटर धावू शकणार आहे. लवकरच ती भारतात लॉन्च होणार आहे. eXUV300 कंपनीची सब-कॉम्पॅक्ट एसयूवी इलेक्ट्रिक अवतार आहे. Mahindra eXUV300 डिजाईनच्या बाबतीत XUV300 सारखी आहे. डिजाईनमध्ये काही अपडेट देखील आहेत. भारतात आधीच लॉन्च असलेली कोना इलेक्ट्रिक एसयूवी आणि एमजी झेड एस ईवीला महिंद्राची ही कार टक्कर देऊ शकते.
Mahindra eKUV100
Mahindra eKUV100 मध्ये 15.9 किलोवाटची लिक्विड कूल मोटर असणार आहे. जी 54Ps च्या पावरने 120NM टॉर्क जनरेट करते. पावरफुल बॅटरीमुळे ही एसयूवी 147 किमीपर्यंत धावू शकेल. ही कार फास्ट चार्जिंग फीचरमुळे 80 टक्के चार्ज होण्यासाठी 50 मिनिटं घेते. या कारची किंमत 8 ते 9 लाख रुपयांच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे.