मुंबई : ऐकेकाळी नोकियाच्या क्लासिक फोनने सर्वांच्या मनावर राज्य केले होते. आता तब्बल 13 वर्षांनंतर  Nokia 5310 Xpress Music फोन पुन्हा भारतात दाखल होणार आहे. १६ जून रोजी नोकियाचा हा फोन भारतात लाँच होणार आहे. पहिल्यांदा, ‘Nokia 5310 एक्सप्रेस म्युझिक’ हा फोन कंपनीने 2007 मध्ये आणला होता.  त्यामुळे  पुन्हा जुन्या फोनचा नव्याने आनंद  घेण्यासाठी सर्वच मोबाईल प्रेमी आतूर झाले आहेत 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नोकिया मोबाइल्स इंडिया ने आपल्या ट्विटर हँडलवरून एक टीझर रिलीज केला आहे.  १० सेकंदाच्या या व्हिडिओमध्ये Nokia 5310 फोनचा लूक अप्रतिम दिसत आहे. नोकियाचा हा फोन व्हाईट, रेड आणि ब्लॅक, रेड रंगात उपलब्ध होईल. कंपनी फोनची वेबसाईटवर नोंदणी सुरू केली आहे. या फोनची किंमत जवळपास ३ हजार रूपये असणार आहे. 



Nokia 5310 Xpress Music फोनचे फिचर्स
-  2.4 इंच QVGA स्क्रीन आणि अल्फान्युमरिक की-पॅड असणार आहे.
- फोनच्या  मागील बाजूस फ्लॅशसह VGA कॅमेरा देखील आहे.
- नवीन Nokia 5310 मध्ये 16MB इंटरनल स्टोरेज असून फोनमध्ये माइक्रोएसडी कार्ड स्लॉटही आहे.
- FM रेडिओ रिसीव्हरही आहे.
- फोनमध्ये 1,200 mAh क्षमतेची रिमूव्हेबल बॅटरी आहे.