मोबाईल बोगस निघाल्याने मागितला रिफंड, तर गुगलने पाठवले १० फोन
कंपनीने ग्राहकाला एक दोन नव्हे तर चक्क १० फोन दिले. पण ग्राहकाने ते घेतले नाही. ग्राहक पूर्ण पैसे परत करण्याची मागणी करत आहे.
मुंबई : नवीन स्मार्टफोनमध्ये काही समस्या असल्यास कंपनी तो परत घेण्याचा दावा करते. त्यासाठी ग्राहकांना वॉरंटी देखील दिली जाते. पण जर तुम्हाला एका मोबाईलच्या बदल्यात १० मोबाईल दिले तर? तुम्हाला नक्कीच आनंद होईल. एका ग्राहकासोबत असंच काही घडलं आहे. ग्राहकाने पिक्सल ३ हा मोबाईल खरेदी केला. पण त्याला त्या फोनमध्ये काही अडचणी आल्याने त्याने गुगल कंपनीकडे पैसे परत देण्याची मागणी केली. पण गुगलने या ग्राहकाला त्या ऐवजी मोठी भेट दिली. कंपनीने ग्राहकाला एक दोन नव्हे तर चक्क १० फोन दिले. पण ग्राहकाने ते घेतले नाही. ग्राहक पूर्ण पैसे परत करण्याची मागणी करत आहे.
कंपनीने पाठवले १० नवे पिक्सल-३ मोबाईल
रेडिट डॉट कॉमवर (www.reddit.com) वर Cheetohz नावाच्या ग्राहकाने दावा केला आहे की Google ने खराब पिक्सेल 3 स्मार्टफोन परत केल्यावर केवळ ८० डॉलर (सुमारे ५,५०० रुपये) दिले आहेत. आणि कंपनीने १० नवीन पिक्सल-३ मोबाईल पाठवले आहेत. ग्राहकाने म्हटलं की, त्याला हे १० नवीन व्हाईट स्मार्टफोन नको आहेत. तो हे फोन परत करणार आहे. त्या ग्राहकाला Google कडून अशी अपेक्षा आहे की कंपनी सर्व पैसे परत करेल. या सर्व प्रकरणात Google ने १० स्मार्टफोन ग्राहकाकडून परत मागितले नाहीत. काही अहवालात असंही म्हटले आहे.