मुंबई : iPhone-X म्हटलं की आपल्यापैकी अनेकजण उत्साहीत होतात. अेकांना आपल्याकडेही iPhone असावा असे वाटते. पण, तुम्हाला माहिती आहे का, iPhone एक्सबाबत धक्कादायक बातमी पुढे आली आहे. ज्यामुळे जगभरातील लाखो मुलींची झोप उडवली आहे. काय आहे हा प्रकार?  घ्या जाणून...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एका ट्विटर यूजरने धक्कादाय ट्विट केले आहे. या यूजरचे म्हणने असे की, गेल्या एक वर्षापासून हा आयफोन महिला आणि तरूणींचे सेक्सी फोटो आपल्या डेटाबेसमध्ये  सेव करत आहे. तर, एली नावाच्या एका यूजरने ट्विटमध्ये म्हटले आहे की, आपल्या आयफोनच्या फोटो अॅपमध्ये जाऊन आपण brassiere टाईप करा. तुम्हाला फोनमधील संपूर्ण कलेक्शन पहायला मिळेल. ज्यात आपली आतापर्यंत टीपलेली क्लीवेज छायाचित्रे पहायला मिळतील. पुढे एलीने म्हटले आहे की, 'तरूणींनो सावधान! आपल्या फोनच्या अॅपमध्ये brassiereटाईप करा. अॅपल हे फोटो का सेव्ह करत आहे?', असा सवालही एलीने विचारला आहे.


दरम्यान या ट्विटला हजारो लोकांनी रिट्विट केले आहे. काही युजर्सनी तर, या धक्कादायक प्रकाराचे स्र्कीनशॉटही पोस्टमध्ये शेअर केले आहेत. काहींनी अॅपलवर रागही व्यक्त केला आहे. क्रिस्टीन नावाच्या एका यूजरने असाच एक स्क्रीनशॉट शेअर केला आहे. जो प्रचंड व्हायरल होत आहे.



दरम्यान, एका वेबसाईटने म्हटले आहे की, या आयफोनबद्धल सुरू असलेल्या चर्चेत पूर्ण सत्य नाही. अॅपल ही छायाचित्रे सेव्ह करत नाही. इतकेच की तुमचे फोटो तो एका ठिकाणी जमा करतो.
मीडिया रिपोर्टनुसार, अॅपलचे हे छुपे फिचर iOS 10 सोबत २०१६मध्ये लॉन्च झाले होते. अॅपलचे हे फोटो अॅप मेटाडेड आणि रेकग्निशन फीचरचा वापर करून त्याला एक टॅग देते. ज्यामुळे एकसारखी दिसणारी छायाचित्रे एकाच ठिकाणी जमा होता. ही छायाचित्रे केवळ आपल्या डिवाईसवरच दिसतात. कोणत्याही प्रकारे अॅपल ती सेव्ह करून स्वत:कडे घेत नाही.



दरम्यान, अॅपलबाबतच्या या चूकीच्या माहितीमुळे सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. ज्यामुळे लोकांच्या गोंधळात भर पडली आहे. मात्र, आयफोनच्या यूजर्सने चिंता करण्याचे कारण नाही