Google वर सर्वाधिक सर्च करण्यात आली श्रीकृष्णाला प्रसाद दाखवल्या जाणाऱ्या `या` पदार्थाची रेसिपी
आगामी 2025 या वर्षाचं सगळे जल्लोषाने स्वागत करत आहेत. तसेच सरत्या वर्षाच्या आठवणी सुध्दा ताज्या करत आहोत. नुकत्याच एका Google Trends रिपोर्टनुसार या वर्षामध्ये सर्वात जास्त सर्च केल्या जाणाऱ्या रेसिपींची यादी समोर आली आहे.
Top 10 most Searched Recipes in 2024: कैक मंडळी कोणताही नवीन खाद्यपदार्थ बनवण्यापूर्वी त्याविषयी गुगलवर सर्च करतात. हे नवीन पदार्थ बनवून अनेकजण खाण्याचा छंद जोपासतात. 2024 मध्ये खाद्यप्रेमींनी (Food Lover) खाण्यापिण्यात अजिबातच माघार घेतली नाही. काही नव्या तर काही जुन्या रेसिपींना खवैय्यांनी भरभरून पसंती दिली. नुकत्याच जाहीर झालेल्या Top 10 most searched recipes in 2024 च्या यादीमध्ये भारतीय सणासुदीला बनवल्या जाणाऱ्या खाद्यपदार्थांची संख्या जास्त आहे.
1. आंब्याचं लोणचं
आंब्याचे लोणचं हे जेवणासोबत तोंडी लावण्यासाठी बनवले जाते. याची आंबट-गोड आणि तिखट चव सगळ्यांना आवडते. उन्हाळ्याच्या दिवसात भारतात घरोघरी हा रुचकर खाद्यपदार्थ बनवला जातो.
2. पॉर्न स्टार मार्टिनी
हे एक विदेशी पेय आहे. भारतात या पेयाने खूप लवकर लोकप्रियता मिळवली. हे कॉकटेल पार्ट्यांमधील सर्वात आवडता ड्रिंक बनला आहे.
3. धणे पंजिरी
धणे पंजिरी सामन्यात: भगवान कृष्णाच्या प्रसादासाठी बनवली जाते. हा खाद्यपदार्थ बहुतेकदा कृष्ण जन्माष्टमीला बनवला जातो.
4. फ्लॅट व्हाइट
फ्लॅट व्हाइट या कॉफीला एस्प्रेसो आणि स्टीम्ड मिल्क यांपासून बनवली जाते. ही कॉफी सिरामिक्सच्या कपमध्ये सर्व्ह केली जाते.
5. कांजी
कांजी हे उत्तर भरतीय पेय गाजर आणि बीटपासून बनवले जाते. याचा रंग गडद गुलाबी असतो. हे आरोग्यावर्धक पेय खूप स्वादिष्ट लागते.
हे ही वाचाः भारतात कोणी खरेदी केलेली पहिली कार? त्या व्यक्तीचं नाव माहितीये? वाचा थक्क करणारा इतिहास
6. शंकरपाळी
शंकरपाळी ही एक दक्षिण भारतीय सणासुदीला बनवली जाणारी मिठाई आहे. ही अतिशय खुसखुशीत आणि रुचकर लागते.
7. ईमा दत्शी
ईमा दत्शी हा बहुचर्चीत भुटानी खाद्यपदार्थ आहे. तो बटाटा आणि पनीरपासून बनवले जातो. या चविष्ट ईमा दत्शीला भातासोबत सर्व्ह करतात.
8. चरणामृत
चरणामृत हे धार्मिक पेय आहे. वेगवेगळ्या मंदिरांमध्ये याचा प्रसाद दिला जातो. हे दूध, दही, मध, तूप आणि सुकामेवा या पाच वस्तूंनी बनवलं जातं. त्यामुळे याला पंचामृत असेही म्हणतात.
9. मार्टिन ड्रिंक
मार्टिन ड्रिंक हे खूप सर्च केलेल्या रेसिपींपैकी एक आहे. हे जिन्न, वर्माउथ आणि बिटर या पदार्थांपासून बनवले जाते.
10. चम्मंथी
चम्मंथी ही दाहवी सर्वात जास्त पसंत केलेली पाककृती आहे. ही दक्षिण भारतीय रेसिपी कोथिंबीर, दही आणि मिरचीपासून बनवली जाते. याला भातासोबत सर्व्ह करतात.