मुंबई : स्मार्टफोन हँग होणं किंवा बॅटरी लवकर डाऊन होण्याची समस्या आपल्यापैकी अनेकांना जाणवत असते. तुम्हीसुद्धा अशाच प्रकारच्या समस्येमुळे हैराण आहात? तर मग ही बातमी तुमच्यासाठी खास आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नेहमीच स्मार्टफोन खरेदी आपण वेगवेगळ्या सेटिंग्स ऑन ठेवतो. मात्र, काही सेटींग्स अशा असतात की ज्यामुळे तुमच्या स्मार्टफोनवर परिणाम होतो.


या सेटिंग्स तुमच्या फोनचा डाटा, बॅटरी आणि सेफ्टीला नुकसान पोहोचवतं. कधी-कधी तर ही सेटिंग आधीपासूनच ऑन राहते तर कधी-कधी चुकून ऑन होते. या सेटिंग्स नेहमीच ऑफ ठेवायाला हव्यात. आज आम्ही तुम्हाला अशाच काही ३ सेटिंग्ससंदर्भात सांगणार आहोत.


कुठून करावी सेटिंग बंद 


फोनच्या सेटिंगमध्ये गेल्यावर गुगल ऑप्शनमध्ये जावं. गुगलचं ऑप्शन प्रत्येक स्मार्टफोनमध्ये वेगवेगळं असतं. या फोनच्या कॉमन सेटिंग्स आहेत ज्या सेटिंग्सच्या ऑप्शनमध्ये असतात. यामध्ये प्ले गेम्सचं ऑप्शन दिसेल. या ऑप्शनवर टॅप केल्यावर दोन सेटिंग्स दिसतील. साईन इन टू गेम्स ऑटोमेटिकली आणि यूज दिस अकाऊंट टू साईन इन (Use this account to sign in) या दोन सेटिंग्स नेहमीच ऑफ ठेवाव्यात.


बॅटरी डाऊन होणं


या दोन सेटिंग्स ऑन ठेवल्यामुळे कुठलाही गेम डाऊनलोड केल्यावर त्यामध्ये ऑटोमेटिकली तुम्ही साईन इन करता. फोनचा डेटा आणि बॅटरी यामुळे खर्च होत राहते. म्हणूनच या सेटिंग्स नेहमी ऑफ ठेवाव्यात. या ऑप्शनमुळे बॅटरीची लाईफ अर्धी होते.


नोटिफिकेशन सेटिंग्स करा बंद


वर दिलेल्या दोन्ही सेटिंग्स बंद केल्यावर त्याखाली आणखीन एक ऑप्शन (रिक्वेस्ट नोटिफिकेशन) दिसेल. ही सेटिंगही ऑफ ठेवणं गरजेचं आहे. जर हे ऑन राहीलं तर गेम्ससंदर्भातील नोटिफिकेशन्स तुम्हाला सलग येत राहतील. त्यामुळे तुमच्या फोनचा डेटा आणि बॅटरी खर्च होईल. तुम्हाला तुमच्या फोनची बॅटरी आणि डेटा सेव्ह करायचा असेल तर या सेटिंग्स नेहमी ऑफ ठेवाव्या.