CNG Cars In India: गेल्या काही महिन्यात पेट्रोल-डिझेलच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. त्यात पेट्रोल-डिझेल गाड्यांना हवा तसा मायलेज मिळत नाही. त्यामुळे कारप्रेमींचा सीएनजी गाड्या घेण्याकडे कल वाढला आहे. बाजारात अनेक सीएनजी कार उपलब्ध आहेत. जर तुम्हालाही चांगला मायलेज देणारी सीएनजी कार घ्यायची असल्यास तुमच्याकडे पाच पर्याय आहेत. यात सर्वाधिक मायलेज मारुति सुझुकी सेलेरियो या गाडीचा आहे. त्यानंतर मारुति सुझुकी वॅगनआर सीएनजी, मारुति अल्टो सीएनजी, मारुति सुझुकी एस-प्रेसो सीएनजी आणि ह्युंदाई सँट्रो सीएनजी यांचा क्रमांक लागतो. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मारुति सुझुकी सेलेरियो सीएनजी (मायलेज - 35.6 किमी/किलो सीएनजी)


मारुति सुझुकी सेलेरियोची किंमत 6.69 लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे. या कारमध्ये 998 सीसी इंजिन आहे, जे 57 एचपी पॉवर आणि 82.1 एनएम टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे. या इंजिनसोबत सीएनजी किट देण्यात आले आहे.


मारुति वॅगनआर सीएनजी (मायलेज - 32.52 किमी/किलो सीएनजी)


वॅगनआर सीएनजी ही मारुति सुझुकी सेलेरिओनंतर दुसरी सर्वाधिक मायलेज देणारी कार आहे. यात 1.0 लीटर पेट्रोल इंजिन दिले आहे आणि यासोबत एक सीएनजी किट आहे. मारुती वॅगनआर सीएनजीची किंमत 6.42 लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे.


मारुति अल्टो सीएनजी (मायलेज - 31.59km/किलो सीएनजी)


या यादीत तिसरा क्रमांक मारुति अल्टो सीएनजीचा आहे. कारमध्ये 796 सीसी इंजिन देण्यात आले आहे, जे 35.3 kW पॉवर आणि 69 एनएम टॉर्क जनरेट करू शकते. सीएनजी किट या इंजिनसोबत येते. अल्टो सीएनजीची किंमत 5.03 लाख रुपये आहे.


मारुति सुझुकी एस-प्रेस्सो CNG (मायलेज - 31.2km/किलो सीएनजी)


या यादीत चौथा क्रमांक मारुति सुझुकी एस-प्रेस्सो सीएनजीचा आहे. तथापि, ते अल्टोच्या तुलनेत किरकोळ कमी मायलेज देते. त्याची किंमत 5.38 लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे. यात 1.0-लिटर पेट्रोल इंजिन आहे.


ह्युंदाई सँट्रो सीएनजी (मायलेज - 30.48km/किलो सीएनजी)


सर्वाधिक मायलेज असलेल्या टॉप 5 सीएनजी कारमध्ये ह्युंदाई सँट्रो सीएनजी पाचव्या क्रमांकावर आहे. त्याची किंमत 6.10 लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे. यात 1.1-लीटर पेट्रोल इंजिन आहे. हे इंजिन 60 पीएस पॉवर आणि 85 एनएम टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे.