व्हॉट्स अॅपनं आणली ही पाच नवी फिचर्स
व्हॉट्स अॅपनं त्यांच्या नव्या व्हर्जनमध्ये पाच नवी फिचर्स आणली आहेत.
मुंबई : व्हॉट्स अॅपनं त्यांच्या नव्या व्हर्जनमध्ये पाच नवी फिचर्स आणली आहेत. या नव्या फिचर्समुळे व्हॉट्स अॅप वापरणं अधिक सोपं होणार आहे तसंच व्हॉट्स अॅप यूजर्सना आणखी ऑप्शनही मिळणार आहे.
सर्च इमोजी ऑप्शन
व्हॉट्स अॅपच्या नव्या फिचरमध्ये सर्च इमोजीचा ऑप्शन देण्यात आला आहे. त्यामुळे चॅटिंग करताना तुम्हाला हवी ती इमोजी सर्च करून पाठवता येणार आहे. चॅटिंग करताना प्रेमासाठीची इमोजी पाठवायची असेल तर सर्चमध्ये Love टाईप केल्यानंतर टूलबारमध्ये याबाबतच्या सगळ्या इमोजी येतील.
फॉण्ट स्टाईल बदलता येणार
याआधी व्हॉट्स अॅपनं फॉण्ट बोल्ड करण्याचा ऑप्शन दिला होता पण आता वेगवेगळ्या फॉण्टमध्ये व्हॉट्स अॅप मेसेज पाठवता येणार आहे. हे फिचर व्हॉट्स अॅपचं नवं व्हर्जन 2.71.251वर उपलब्ध आहे.
गुगल ड्राईव्हवर घेता येणार चॅटिंगचा बॅक अप
व्हॉट्स अॅपवर आलेले महत्त्वाच्या मेसेजचा आता गुगल ड्राईव्हवर बॅक अप घेता येणार आहे. यासाठी व्हॉट्स अॅपच्या Menu Button > Settings > Chats and calls > Chat backupवर जा. यानंतर Back up to Google Driveवर क्लिक करा आणि तुमच्या गरजेनुसार Daily, Weekly किंवा Monthly चॅटचा बॅक अप घ्या.
डॉक्यूमेंट्स पाठवता येणार
महत्त्वाची डॉक्यूमेंट्सही आता व्हॉट्स अॅपवरून पाठवता येणार आहेत. एका वेळी जास्तीत जास्त 100 एमबीची डॉक्यूमेंट्स व्हॉट्स अॅपवरून पाठवता येऊ शकणार आहेत.
आवश्यक मेसेज बूकमार्क करा
महत्त्वाचे मेसेज बूकमार्क करण्याचा ऑप्शन आत्तापर्यंत ईमेलवरच मिळत होता पण आता व्हॉट्स अॅप वरही महत्त्वाचे मेसेज बूकमार्क करता येणार आहेत.