नवी दिल्ली : ऑटो एक्सपो २०१८च्या पहिल्याच दिवशी वेगवेगळ्या कार लॉन्च झाल्या आहेत. यामध्ये देशातली दुसरी सगळ्यात मोठी कार निर्माती कंपनी हुंडाई मोटर इंडियानं त्यांची प्रसिद्ध हॅचबॅक एलीट आय २०चं फेसलिफ्ट वर्जन लॉन्च केलं. नवीन एलीट आय २०च्या एक्सटीरियर आणि इंटिरियर दोघांमध्ये बदल करण्यात आला आहे. या कारच्या रियरमध्ये मोठा टेल लॅम्प आणि टेलगेटला रिडिझाईन करण्यात आलंय. नव्या २०१८ आय २० मध्ये नवीन अलॉय व्हील्स आणि एक्सटीरियरमध्ये फ्लेम ऑरेंज रंग देण्यात आलाय. या गाडीचं पेट्रोल वर्जन ५.३४,९०० रुपयांपासून सुरु होतं. तर डिझेल वर्जनची किंमत ६,७३,००० रुपये आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दक्षिण कोरियाची कार निर्माती कंपनी किया मोटर्सनं त्यांची कॉन्सेप्ट कार एसपी लॉन्च केली. या कारचा स्टायलीश लूक देशातल्या वेगवेगळ्या कारना टक्कर देईल. एसपी कारची अधिकृत लॉन्चिंग २०१९च्या दुसऱ्या भागात होईल. भारतातल्या रस्त्यांसाठी एसपी कारला वेगळं डिझाईन करण्यात आल्याचा दावा कंपनीनं केला आहे.


होंडानं अमेज कारचं सबकॉम्पॅक्ट सेडान वर्जन लॉन्च केलं. या कारची स्पर्धा नवीन डिझायरशी होणार आहे. होंडा अमेजमध्ये १.२ लीटर V-TEC पेट्रोल आणि १.५ लीटर D-TEC इंजिन असेल. या कारमध्ये ऑटोमॅटिक गियर बॉक्स देण्यात आलाय. अमेजमध्ये सुरक्षेसाठी खास उपाययोजना देण्यात आलाय.


मारुती सुझुकीची कॉन्सेप्ट कॉम्पॅक्ट एसयूव्ही फ्यूचरS कार ऑटो एक्सपोमध्ये लॉन्च करण्यात आली. फ्यूचरS ही कार मारुतीची बेस्ट सेलिंग कार अल्टोला रिप्लेस करु शकते.


दुचाकी निर्माती कंपनी सुझुकी इंडियानं ऑटो एक्स्पोमध्ये स्कूटर आणि बाईक लॉन्च केली. सुझुकीनं त्यांच्या लेटेस्ट बर्गमेन शिवाय गिक्सर, इंट्रू़डर बाईक लॉन्च केली. बर्गमेन १२५ सीसी पासून ६३८ सीसीपर्यंतच्या इंजिन वेरियंटसोबत आहे. पण भारतामध्ये कंपनीनं १२५ सीसीचं मॉडेल लॉन्च केलं. सुझुकीच्या या स्कूटरला १४ इंचांची चाकं देण्यात आली आहेत.