मुंबई : इन्स्टंट मेसेजिंग अॅप व्हॉट्सअॅपचा वापर जगातील तब्बल १.३ बिलिय लोक करतात. यामुळे मित्र-मैत्रिणी,नातेवाईकांशी सहज संवाद साधता येतो. व्हॉट्सअॅपमध्ये ग्रुप तयार करण्याची सुविधा देण्यात आल्यानंतर तर एकाचवेळी अनेकांशी संवादही साधता येतो. तुमच्याआधिक अधिकाधिक युजर्स हे अनेक ग्रुपमधील मेंबरही असतील. तुम्ही ग्रुप चॅटिंग करत असाल तर खालील गोष्टींकडे लक्ष देणे तितकेच गरजेचे असते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

१. ग्रुपमध्ये चॅट करताना टेक्स ऐवजी इमोजीचा वापर अधिक करा, ज्यामुळे चॅटिंग करताना इतर मेंबर बोअर होणार नाहीत. तसेच चॅटमध्ये GIFचाही वापर करा.


२. ग्रुपमध्ये कोणाच्याही परवानगीशिवाय कोणत्याही प्रकारचा स्क्रीनशॉट घेऊन नका. घेत असाल तर आधी परवानगी घ्या.


३. ग्रुपमध्ये आपल्याशिवायही अनेक व्यक्ती असतात. त्यामुळे मेसेज करताना वेळेचं भान ठेवा. आपल्या अवेळी मेसेज केल्याने ग्रुपमधील इतर सदस्यांना त्रास होणार असेल तर तसे करणे टाळा.


४. ग्रुपमध्ये नेहमीच लहान लहान आणि पॉईंट टू पॉईंट बोला. उगाच लांबलचक मेसेज करु नका. तुमचे लांबलचक मेसेज वाचण्याइतका वेळ कुणाकडे नसतो. 


५. ग्रुपमध्ये एकाच व्यक्तीशी चॅट करत असाल तर त्या व्यक्तीशी पर्सनल चॅट करा. तुमच्या चॅटिंगमुळे ग्रुपमधील इतर सदस्यांना त्रास होऊ शकतो.