Thieves Android Phone: अनेकदा मोबाईल चोरीच्या बातम्या चर्चेत असतात. एकदा चोरीला गेलेला मोबाईल परत मिळणं फारच कठीण असतं. मात्र असा प्रकार खरोखर घडला असून चोरीला गेलेला मोबाईल चोरांनीच परत आणून दिला आहे. सामान्यपणे चोरलेली गोष्ट चोर परत आणून देण्याचे प्रकार घडत नाहीत. पण एका अपवादात्मक प्रकरणामध्ये चोरांनीच चोरलेला फोन परत आणून दिला. या कथाकथित चोरीमध्ये मुखवटा घातलेल्या 2 चोरांनी विनम्रपणे एका व्यक्तीचा अ‍ॅण्ड्रॉइड फोन परत केला. मात्र त्याने असं का केलं हा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर ते कारण अधिक रंजक आहे.


सर्व गोष्टी खेचून घेतल्या पण...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, बंदुकीचा धाक दाखवून चोरी केल्यानंतर आपण चोरलेले फोन हा आयफोन नसल्याचं चोरांच्या लक्षात आलं. आयफोन चोरण्याच्या विचारानेच चोरांनी हल्ला केला होता. या चोरांनी या जोडप्याकडील सर्व वस्तू घेतल्या आणि जाता जाता चोरलेले फोन परत केला. आपल्याला अपेक्षित असलेला फोन नसल्याने चोरांनी तो परत केला. हा हल्ला वॉशिंग्टन, डी. सीमध्ये झाला होता. काही शस्र चोरांनी गाडीमधून उतरल्यानंतर एका जोडप्याला लुटलं होतं.


फोन हातात घेतल्यानंतर चोर काय म्हणाले?


समोर आलेल्या माहितीनुसार, चोरांनी पीडित व्यक्तीकडील चाव्या आणि स्मार्टफोन या वस्तू चोरल्या. या व्यक्तीच्या शर्टच्या खिशातील वस्तूही चोरांनी काढून घेतल्या. मात्र या व्यक्तीचा मोबाईल हा अ‍ॅण्ड्रॉइड फोन होता. चोरांना हा फोन चोरण्यात फारसा रस नव्हता. "त्यांनी फोन हातात घेतल्यानंतर तो पाहिला आणि त्यांच्यापैकी एकजण अरे, हा अ‍ॅण्ड्रॉइड फोन आहे का? आम्हाला हा फोन नको आहे. मला वाटलं की हा आयफोन आहे," असं म्हटलं. 


नेमकं हे घडलं कसं?


'एबीसी सेव्हन'ने दिलेल्या वृत्तानुसार, वॉशिंग्टन, डी. सीमध्ये हल्ला झालेल्या या जोडप्याने आपली ओळख जाहीर केलेली नाही. पत्नी मध्यरात्रीनंतर कामावरुन परत आल्यानंतर कार पार्क करण्यासाठी मदत करायला पती इमारतीच्या पार्किंग लॉटमध्ये गेला होता. त्यावेळी इमारतीच्या गेटच्या बाहेर असलेल्या काही अज्ञात व्यक्तींनी मदत मागण्याच्या उद्देशाने त्यांना बाहेर रस्त्यावर बोलवलं आणि या दोघांवर हल्ला केला. शस्त्र दाखवून या दोघांना धमकावत त्यांच्याकडील वस्तू खेचून घेतल्या. मात्र नंतर जाताना मोबाईल या चोरांनी परत केला. या हल्ल्याचा आपल्याला फार मोठा धक्का बसल्याचं या महिलेने सांगितलं आहे.