2018 मध्ये भारतात सर्वाधिक विकले गेलेले स्मार्टफोन
भारतात सर्वाधिक विकले गेले हे फोन...
मुंबई : भारत हा स्मार्टफोनसाठी खूप मोठं मार्केट आहे. भारतात मोठ्या प्रमाणात स्मार्टफोन वापरला जातो. जगात स्मार्टफोन वापरणाऱ्या लोकांच्या यादीत भारताचा पहिला क्रमांक लागतो. आज भारतात अनेक मोठ्य़ा कंपन्यांनी आपले फोन लाँच केले आहेत. अनेक परदेशी कंपन्यांचे फोन भारतात मोठ्या प्रमाणात विकले जातात. पाहा कोणते फोन 2018 च्या सुरुवातीच्या 3 महिन्यात सर्वाधिक विकले गेले. या फोनमध्ये अॅपल, सॅमसंग आणि शाओमी आणि ओपो या कंपन्यांचा समावेश आहे. रिसर्च कंपनी काउंटरपॉइंटने ही लिस्ट जाहीर केली आहे. सर्वाधिक विकले गेलेले फोन खालील प्रमाणे.
1)iPhone X
2)Apple iPhone 8 Plus
3)Xiaomi Redmi 5A
4)Oppo A83
5)Samsung Galaxy S9
6)Samsung Galaxy S9+
7)Apple iPhone 7
8)Samsung Galaxy J7 Pro
9)Apple iPhone 6
10)Apple iPhone 8