मुंबई : वीज कोसळून मृत्यू पावणाऱ्यांची संख्या देशभरात मोठी आहे. त्यात वीज कोसळणे ही पूर्णत: नैसर्गिक घटना. त्यामुळे त्यावर नियंत्रण मिळवणे आतापर्यंत विज्ञानाला शक्य झाले नाही. पण, असे असले तर, वीज कोसळण्याची पूर्वमाहिती आता तुम्हाला मिळू शकते. कर्नाटकच्या नॅचरल डिजास्टर मॉनेटरींग सेंटर (KSNDMC) आणि रेव्हेन्यू डिपार्टमेंटने शुक्रवारी एक जबरदस्त मोबाईल अॅप लॉन्च केले आहे. 'सिदिलु' असे नाव असलेलेल हे अॅप युजर्सला वीज कोसळण्यापूर्वी किमान ४५ मिनिटे अलर्ट देणार आहे.


सर्वसामान्यांसाठी फायदेशीर अॅप


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हे अॅप गुगल प्ले स्टोअरव आणि अॅपल स्टोअरवर मोफत उपलब्ध असून, तुम्ही ते केव्हाही डाऊनलोड करू शकता. हे अॅप वीज कोसळण्यापूर्वी ४५ मिनिटे आगोदर तुम्हाला संकेत देईल. हे संकेत तुमच्या मोबाईल स्क्रिनवर लाल रंगात येईल. ज्यात लिहून येईल की, तुम्ही सध्या धोकादायक परिसरात आहात. तुम्ही उपस्थित असलेल्या ठिकाणापासून १ स्वेअर किलोमिटर अंतारार वीज कोसळण्याची शक्यता ९० टक्के आहे. याच अॅपमद्ये नारंगी रंगातही एक संदेश येईल जो सांगेन की, तुम्ही उपस्थित असलेल्या ५ स्क्वेअर किलोमीटर अंतारवर आणि पिवळ्या रंगात येणार मेसेज सांगेन की तुम्ही उपस्थित असणाऱ्या ठिकाणापासून १५ स्वेअर किलोमीटर परिसरात वीज कोसळण्याची शक्यता आहे.


वीज कोसळण्याबाबत सुरक्षेसंबंधीही माहिती


दरम्यान, मोबाईल स्क्रिनवर दिसणारा निळा रंग हा युजर्स उपस्थित असलेल्या परिसरात पूर्णपणे सुरक्षित असल्याचे दाखवतो. KSNDMC चे डायरेक्टर श्रीनिवास रेड्डी यांनी सांगितले की, यूएसच्या एका कंपनी अर्थ नेटवर्कने हे अॅप तयार केले आहे. रेड्डी यांनी म्हटले आहे की, अॅपमध्ये हेही सांगितले आहे की, वीज कोसळण्याची शक्यता असताना तुम्ही काय काळजी घ्यायला हवी.