मुंबई : काही दिवसांपूर्वी टेलिकॉम क्षेत्रात मोठा गाजावाजा करीत रिलायन्स जिओने आजपर्यंतचा सर्वात स्वस्त रिचार्ज प्लॅन सादर केला. या प्लॅनची किंमत एक रुपये इतकी होती. परंतु हा प्लॅन सध्या कंपनीच्या वेबसाइट आणि मोबाईल ऍपवर उपलब्ध नाही. म्हणजेच कंपनीने हा प्लॅन रद्द केल्याची शक्यता आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आता Jio चा  1 रुपयांचा प्लॅन पुन्हा चर्चेत आला आहे. कारण आता तो कंपनीच्या वेबसाइट आणि मोबाइल अॅपवर उपलब्ध नाही. याचा अर्थ कंपनीने हा प्लॅन ग्राहकांना न कळवताच बंद केला आहे.


Jio चा 1 रुपयांचा रिचार्ज प्लॅन


लॉन्चच्या वेळी या प्लानमध्ये 100MB हाय-स्पीड 4G डेटा आणि 30 दिवसांची वैधता दिली जात होती. सुधारित प्लॅनमध्ये 1 दिवसाच्या वैधतेसह 10MB 4G डेटा मिळत होता. 


पण, आता हा प्लॅन वॅल्यू या सेगमेंटच्या यादीतूनच काढून टाकण्यात आला आहे. जर प्लॅन लगेच मागे घ्यायचा होता तर कंपनीने तो सुरू केलाच का असा प्रश्न ग्राहक विचारीत आहेत.