भारतातील सर्वात स्वस्त फोन मिळतोय ३४९ रुपयांत
या फोनची किंमत फक्त ३४९, ३६९ आणि ४९९ रुपये आहे.
नवी दिल्ली : सध्या ऑनलाईन शॉपिंगचा जमाना सुरू आहे. त्यात प्रत्येक मोबाइल कंपनी ग्राहक आपल्याकडे खेचण्यासाठी स्वस्तामध्ये जास्त फिचर्स असलेले मोबाईल देत आहे. पण स्वस्त म्हणजे तरी किती ? जिओने १५०० मध्ये फोन आणल्यावर बाकीच्या कंपन्यांचे धाबे दणाणले. पण आता याही पलिकडे जाऊन केवळ ३४९ रुपयात फोन मिळाला तर ? हे खर आहे.
सध्या फ्लिपकार्ट, अॅमेझॉन, आजियो, मिंत्रा आणि स्नॅपडिलवर बिग सेल सुरु आहे. या ऑफरमध्ये ऑनलाईन शॉपिंग वेबसाईट या फोनची जाहिरात येत आहे.
शॉपक्लूजवर देशातील सर्वात स्वस्त फोन असल्याचा दावा कंपनीने केला आहे. या फोनची किंमत फक्त ३४९, ३६९ आणि ४९९ रुपये आहे. हा फोन ऑनलाईनवर उपलब्ध असून कॅश ऑन डिलीव्हरीसुद्धा उपलब्ध आहे. त्यामूळे हा फोन घेण्यासाठी ग्राहक आता गर्दी करू लागले आहेत. मोबाईल कंपन्यांच्या या स्पर्धेत ग्राहकांना जास्तीत जास्त फायदा मिळतोय हे सर्वात महत्त्वाच म्हणाव लागेल.
४९९ रुपयांच्या फोनचे फिचर्स
कॅमेरा, ब्लूटूथ,एफएम आणि दोन ड्युअल सिम
बॅटरी- १००० एमएएच
नेटवर्क – २जी
वॉरंटी – ६ महीने
एसेसरीज वॉरंटी – १ महीने
एक्सपांडेबल मेमरी – ८ जीबी
डिस्प्ले – १.८ इंच
इंटरनल स्टोरेज- ३२ एमबी
रॅम – ३२ एमबी