Meera Minicar History in India: चीन आणि यूएसनंतर भारतीय बाजारात सर्वाधिक गाड्यांची खरेदी विक्री होत असते. त्यामुळे ऑटो कंपन्यांची नजर कायमच भारतीय बाजारपेठेवर असते. तसेच नव्या ऑटो कंपन्याही बाजारात आपली ओळख निर्माण करत आहेत. स्वातंत्र्यानंतर अनेक कंपन्यांनी बाजारात एन्ट्री मारली पण काही कंपन्यांना यश, तर काही कंपन्यांच्या पदरी अपयश आलं. अशाच एका कंपनीचं नाव सध्या चर्चेत आहे. मीरा ऑटोमोबाइल्स (Meera Automobiles) असं कंपनीचं नाव आहे. टाटा नॅनोच्या कित्येक वर्षांपूर्वी या कंपनीने स्वस्त आणि मस्त छोटी कार लाँच केली होती. सामान्य कुटुंब डोळ्यासमोर ठेवून ही कार तयार केली होती. या गाडीला 'मीरा मिनी कार' असं नाव देण्यात आलं होतं. मात्र सरकारी उदासीनतेमुळे ही गाडी लाँच होऊ शकली नाही.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वर्ष 1949 साली उद्योगपती शंकरराव कुलकर्णी (Shankarrao Kulkarni) यांनी ही गाडी तयार केली होती. सामान्य कुटुंब डोळ्यासमोर ठेवून या गाडीची किंमत फक्त 12 हजार रुपये होती. या गाडीचा पहिला प्रोटोटाइप 1949 साली तयार करण्यात आला होता. ही गाडी कुलकर्णी मुंबईच्या आसपास चालवायचे. हटके लूकमुळे ही गाडी चर्चेचा विषय ठरली होती. ही कार आरटीओने रजिस्टरदेखील केली होती. या गाडीचा नंबर MHK 1906 असा होता.


मीरा मिनी कार टू सीटर कार होती. कुलकर्णी यांनी या गाडीचे 5 मॉडेल तयार केलं होतं. शेवटचं मॉडेल 1970 मध्ये आलं होतं. या गाडीचा रजिस्ट्रेशन नंबर MHE 192 असा होता. या गाडीचा मायलेज पेट्रोलवर 20 KMPL होता. शंकरराव यांचे नातू हेमंत कुलकर्णी यांच्या मते, "मीरामध्ये टाटा नॅनोसारखी समानता होती. दोन्ही गाड्यांना सिंगल वायपर, रियर इंजिन, मायलेज आणि 5 सीटरसह होती"


बातमी वाचा- Cheapest EV: 'ही' आहे देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार, आतापर्यंत दोन हजार गाड्यांची बुकिंग


या कारणामुळे कार लाँच झाली नाही


उद्योगपती शंकरराव यांनी केंद्र सरकारकडे कारखाना प्रस्थापित करण्यासाठी संपर्क साधला होता. मात्र तेव्हाच्या सरकारनं त्यांना सहकार्य केलं नाही. 1975 मध्ये त्यांचा प्रस्ताव सरकारनं नाकारला. कारण सुझुकी भारतीय बाजारात आणण्याची योजना आखली होती. मात्र या कारनिर्मितीसाठी शंकररावांनी जवळपास 50 लाख खर्च केले होते. त्यामुळे कारखाना उभं करणं कठीण होतं.