Tech News: देशानं मागील काही दिवसांमध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रांमध्ये चांगलीच प्रगती केली आहे. अशा या क्षेत्रात आणि त्यातही विशेष म्हणजे लॅपटॉप आणि तत्सम गोष्टींच्या बाबतीतकाही कंपन्यांना युजर्सची अधिक पसंती. अॅपल, एचपी, डेल ही त्यातलीच काही नावं. आता या सर्व नावांना तगडं आव्हान देण्यासाठी एक फ्रेंड कंपनी भारतीय बाजारपेठेत एंट्री करणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

2020 मध्ये भारत सरकारनं सुरु केलेल्या PLI योजनेअंतर्गत स्थानिक उत्पादन निर्मितीला चालना देणाऱ्या कंपन्यांमध्ये आता आणखी एका कंपनीचं नाव जोडलं जाणार आहे. ज्यामध्ये नोएडामध्ये माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रात काम करणाऱ्या एका समुहाकडून थॉमसन या फ्रेंच कंपनीचे लॅपटॉप तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. थोडक्यात आता थॉमसन ही कंपनी भारतात लॅपटॉप तयार करणार असून, पॉकेट फ्रेंडली एंट्री लेवल लॅपटॉप तयार करणं हा त्यामागचा मुख्य हेतू असेल. 


किंमतही सर्वांना परवडणारी... 


ET च्या वृत्तानुसार थॉमसन कंपनीक़डून भारतात सध्या प्राथमिक स्तरावरील युजर्सना केंद्रस्थानी ठेवत आहे. कंपनीच्या व्यवस्थापकीय अध्यक्षपदी असणाऱ्या पियरे क्रास्नोव्स्की यांनी दिलेल्या माहितीनुसार सध्या कंपनीकडून 19,990  रुपयांच्या दरांमध्ये विंडोज 11 वर चालणारा लॅपटॉप कंपनीकडून सादर करण्यात येणार आहे. त्यामुळं आता एका चांगल्या Android Phone हूनही कमी किंमतीत तुम्हाला लॅपटॉप खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. 


हेसुद्धा वाचा : 'इथं' अवघ्या 24 तासांसाठीच टिकतं लग्न; कारण ऐकून तळपायाची आग मस्तकात जाईल 


तुम्ही कुठं खरेदी करु शकता हे लॅपटॉप? 


Amazon, Flipkart, Croma, Vijay Sales या ईकॉमर्स साईट आणि विविध उपकरणं विक्री करणाऱ्या Stores मधून तुम्ही पुढील वर्षापासून हे लॅपटॉप खरेदी करु शकता. थॉमसन कंपनीकडून शालेय आणि शैक्षणिक वापरासाठी लॅपटॉपचं महत्त्वं आणि तत्सम उद्देशांसाठीसुद्धा प्रस्ताव पुढे केले असून, प्रोडक्ट्स सार्वजनिक स्तरावर खरेदी करण्यासाठी सरकारी ई-मार्केटप्लेस (जीईएम) पोर्टलवरही लिस्ट केलं जाणार असल्याचं सांगितलं.