मुंबई : शॉर्ट व्हीडिओ स्ट्रीमिंग मोबाईल अ‍ॅप्लिकेशन टिकटॉकने केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाला माहिती दिली आहे की, त्यांनी नवीन सोशल मीडिया आणि मध्यस्थ मार्गदर्शक तत्त्वांचे पालन केले आहे, तरीही भारतात या अ‍ॅपवरील बंदी कायम आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या प्रकरणाशी परिचित असलेल्या एका व्यक्तीने सांगितले की, ''मंत्रालयाला पाठवलेल्या पत्रात टिकटॉकने म्हटले आहे की, त्यांनी नव्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन केले आहे." परंतु मंत्रालयाच्या एका अधिकाऱ्याने या प्रकरणाची माहिती देत म्हटले आहे की, कंपनी मार्गदर्शक तत्त्वांचे अनुसरण करत आहे, ही चांगली गोष्ट आहे. परंतु त्याचा अ‍ॅपवरील बंदीवर परिणाम होण्याची शक्यता नाही. टिकटॉकने हे सोशल मीडियामधील महत्वाचे प्लॅटफॉर्म नव्हते, ज्यांचे 50 लाख किंवा अधिक यूझर्स आहेत, ज्यांना मार्गदर्शक तत्त्वांचे अनुकरण करण्यास सांगितले गेले होते.


टिकटॉकला भारतात परतण्याची आशा


प्रवक्त्याने सांगितले की, "टिकटॉक भारतीय बाजारासाठी पूर्णपणे वचनबद्ध आहे. आम्ही नेहमीच कायद्याचे पालन करण्याचे काम केले आहे आणि भारतात परत येण्यासाठी आणि आमच्या लाखो क्रिएटर्स आणि यूझर्सना पुन्हा एक मजेदार प्लॅटफॉर्म देण्यासाठी आणि सरकारसोबत काम करण्यासाठी उत्सुक आहोत."]


ट्वीटर, व्हॉट्सअ‍ॅप आणि फेसबुकसारख्या कंपन्यांना कंटेंटचे नियमन करण्यास आणि मर्यादा लावण्याची जबाबदारी घेण्यासाठी अधिकाऱ्यांची नेमणूक केली आहे आणि त्यांना या संदेशाचा मागोवा घेण्याच्या नव्या मार्गदर्शक सूचनांचे काम सोपवले आहे.