मुंबई : स्मार्टफोनचा वापर सध्या इतका वाढला आहे की, आजकाल प्रत्येक व्यक्तीकडे आपल्याला स्मार्टफोन दिसतोच. स्मार्टफोनच्या वापरामुळे अनेक गोष्टी सोप्या झाल्या आहेत. आपल्याला कोणतीही अडचण आली की आपण पहिला हातात फोन घेतो आणि सगळं शोधू लागतो. परंतु यासाठी सगळ्यात महत्वाचं असतं ते इंटरनेट. परंतु, अनेक लोक तक्रार करतात की, त्यांच्या स्मार्टफोनवरील इंटरनेटचा वेग कमी झाला आहे. यासाठी त्यांचा इंटरनेट ऑपरेटर कारणीभूत असू शकतो. परंतु यामागे इतर अनेक कारणं देखील आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या समस्येवर मात करण्यासाठी, आपल्याला काही स्टेप्स फॉलो कराव्या लागतील, येथे आम्ही तुम्हाला Android स्मार्टफोनमध्ये इंटरनेट स्पीड वाढवण्यासाठी काही टिप्स सांगत आहोत.


कॅशे साफ करा


कॅशेमुळे फोनची मेमरी वाढत राहते, ज्यामुळे तुमचा फोन स्लो होतो. इंटरनेट कनेक्शनची गती वाढवण्यासाठी, तुम्ही तुमच्या Android फोनची कॅशे मेमरी साफ करा.


न वापरत असलेले ऍप्स काढा


असेही काही ऍप्स आहेत, जे बॅकग्राउंडमध्ये चालू राहतात आणि इंटरनेट वापरत राहतात. त्यामुळे तुम्हाला गरज असतील तेवढेच अॅप्स ठेवा. बाकी अनावश्यक अॅप्स डिलीट करून तुम्ही तुमच्या फोनची मेमरी आणि इंटरनेट बँडविड्थ वाढवू शकता.


जाहिरात ब्लॉकरा


बरेच लोक पॉप-अप जाहिराती काढण्यासाठी अॅड ब्लॉकर वापरतात. साइटवर पॉप-अप जाहिरातींच्या उपस्थितीमुळे, ती साइट स्लो होते. कधीकधी पॉप-अपमध्ये व्हिडीओ किंवा फोटो देखील असतो. तुम्ही अॅड ब्लॉकर अॅप्स वापरूनही ते ब्लॉक करू शकता.


नेटवर्क प्रकार


योग्य नेटवर्क निवड न केल्यामुळे तुमच्या इंटरनेटचा वेग कमी असू शकतो. तुमचे सेल्युलर नेटवर्क 4G वर सेट ठेवा. जेणेकरून तुम्हाला चांगला इंटरनेट स्पीड मिळेल.