मुंबई : टेकनॉलॉजीच्या वाढत्या वापरामुळे अनेक सुविधा हाताशी असल्या तरी त्यामुळे अनेकदा नुकसानाला सामोरे जावे लागू शकते. त्यामुळे सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे. तुमचा डेटा सुरक्षित राहावा, यासाठी काही टिप्स...


पासवर्ड 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोशल मीडिया असो किंवा अॅप पासवर्ड एक असा मार्ग आहे ज्यामुळे तुमचा डेटा सुरक्षित राहतो. मात्र तो विशेष असणे गरजेचे आहे. जर तुम्हाला तुमचा पासवर्ड Password हा शब्द ठेवायचा असल्यास तो P4$$w0rd अशा पद्धतीने लिहा. त्यामुळे पासवर्ड हॅक होणे कठीण होईल. लक्षात ठेवा पासवर्ड जितका मोठा असेल किंवा वेगळा असेल तेवढा हॅक करणे कठीण होईल.


डिव्हाईस लॉक ठेवा


फेस आयडी, टच आयडी आणि पासकोड यांसाख्या फिचरचा वापर करा.


अॅप काळजीपूर्वक डाऊनलोड करणे गरजेचे आहे


गुगल प्ले स्टोरवरून कोणतेही अॅप डाऊनलोड करताना विशेष काळजी घ्या. अॅप डाऊनलोड करताना कोणकोणती माहिती एक्सेस करण्याची परवांगी मागत आहे, ते तपासा. जर एखादी अट मान्य नसल्यास तो अॅप डाऊनलोड करु नका. त्याचबरोबर जे अॅप तुम्ही वापरत नाही ते फोनमधून डिलीट करा.


पब्लिक वायफाय सावधगिरीने वापरा


अनेकदा पब्लिक वाय-फायचे नोटीफिकेशन येते. अशावेळी वायफायचा वापर करताना कोणतीही महत्त्वपूर्ण लॉगिंग करणे टाळा. 


अपडेट


हॅकर्सपासून वाचण्याचा सोपा उपाय म्हणजे फोन आणि अॅप्स अपडेट ठेवा. अॅप्समध्ये अपडेट त्याची सुरक्षा, प्रायव्हेसी आणि फिचर्स संदर्भात असते. अशावेळी जर तुमचे अॅप जूने असेल तर हॅकर्सला ते हॅक करणे सोपे जाईल.


सेटिंग्स चेक करा


आपले स्मार्टफोन्स, ऑनलाईन अकाऊंट आणि अॅप्सची सेटिंग्स जरूर चेक करा. तुम्हाला काही त्रास होत असल्यास तुम्ही सेटिंग्स बदलू शकता.