पठ्ठ्यानं Fortuner कारमध्येच बनवलं टॉयलेट; पाहा `हा` अनोखा व्हिडीओ
या कारमध्ये पाण्याचीही सोय करण्यात आलीय त्यामुळे ही गाडी घेऊन कुठेही जाता येऊ शकते
Toilet in Toyota Fortuner : आतापर्यंत तुम्ही कारप्रेमींनी त्यांच्या कार मॉडिफाय केलेल्या पाहिल्या असतील. कारप्रेमी आपल्या गाडीचे लाईट, टायर, इंजिन, इंटिरीयर, सनरुफ अन्य काही गोष्टी मॉडिफाय करतात. पण अशाच एका वाहनप्रेमीने टोयोटो कंपनीच्या फॉर्च्युनर (Toyota Fortuner) कारला अशा प्रकारे मॉडिफाय केलीय सर्वांनाच आश्चर्यचा धक्का बसलाय. (Toilet made in Toyota Fortuner car now no need to get down from car)
दूरच्या प्रवासासाठी जात असाल तर ही गाडी अत्यंत महत्त्वाची अशी आहे. या व्यक्तीने आपल्या टोयोटा फॉर्च्युनर (Toyota Fortuner) कारमध्ये टॉयलेट शीट बसवली. Revokid Vlogs नावाच्या YouTube चॅनलने हा व्हिडिओ वर्षभरापूर्वी अपलोड केला आहे. आतापर्यंत लाखो लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे. 3 मिनिटे 45 सेकंदाच्या या व्हिडीओमध्ये फॉर्च्युनर कारबाबत माहिती देण्यात आलीय. बाहेरून ही कार सामान्य टोयोटा फॉर्च्युनरसारखी दिसते. पण तिसऱ्या रो मध्ये मोबाईल टॉयलेट (Toilet) बसवण्यात आले आहे. या प्रसाधनगृहात पाण्याच्या सोयीसाठी मागच्या बाजूला खास टाकी बसवण्यात आली आहे.
टॉयलेटचा (Toilet) आकार इतका लहान आहे की ते फक्त एका सीटची जागा घेतो. त्याच्या शेजारची सीट आरामात बसण्यासाठीही वापरता येऊ शकते. म्हणजेच टॉयलेट बसवल्यानंतरही ही कार 6 सीटरच राहते. त्यामुळे एखाद्या व्हॅनिटी व्हॅनसारखा (Vanity van) अनुभव या कारमध्ये येतो. लांबच्या प्रवासासाठी ही कार अत्यंत उपयुक्त ठरु शकते. यूट्यूब व्हिडिओनुसार या टोयोटा फॉर्च्युनरमध्ये OJES AUTOMOBILESने बदल करण्याचे काम केले आहे. हे टॉयलेट खास दिव्यांगांसाठी बसवण्यात आले आहे. कारचा उपयोग चॅरीटी कामांसाठी केला जातो. या प्रकारच्या मॉडिफिकेशनसाठी 70 हजार ते 1 लाखांपर्यंत खर्च येऊ शकतो.