Best automatic cars: देशात सध्या पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत मोठी वाढ झाली आहे. पेट्रोल शंभर तर डिझेल नव्वदीच्या घरात गेले आहे. त्यामुळे इलेक्ट्रिक गाड्यांकडे लोकांचा कल वाढला आहे. दरम्यान ऑटोमॅटिक कारमध्ये सर्वात मोठा फायदा म्हणजे तुम्हाला क्लच पुन्हा पुन्हा द्यावा लागत नाही. तुम्हाला जर स्वस्त किंमतीत चांगला मायलेज देणारी कार खरेदी करायची असेल तर या ठिकाणी खास माहिती दिली आहे. जाणून घ्या सविस्तर माहिती. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

Maruti Suzuki Swift : मारुती सुझुकी स्विफ्ट ही लोकप्रिय हॅचबॅक कार आहे. या कारमध्ये 1.2-लीटर पेट्रोल इंजिनसह मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक पर्याय देण्यात आले आहेत. त्याची किंमत ₹ 5.90 लाख पासून सुरू होते. तथापि, ऑटोमॅटिक गिअरबॉक्ससह त्याचा सर्वात स्वस्त प्रकार 7.32 लाख रुपयांमध्ये उपलब्ध आहे. या गिअरबॉक्ससह, तुम्हाला 23.76 kmpl पर्यंत मायलेज मिळेल.


Tata Punch : टाटाच्या सर्वात स्वस्त एसयूव्हीला ग्राहकांची चांगलीच पसंती आहे. या कारचा टॉप 10 वाहनांच्या यादीत समावेश झाला. यात 1.2-लीटर पेट्रोल इंजिनसह मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक गिअरबॉक्सेस मिळतात. त्याच्या ऑटोमॅटिक वेरिएंटची किंमत 7.30 लाख रुपयांपासून सुरू होते. तर टाटा पंच 18.82 kmpl ते 18.97 kmpl दरम्यान मायलेज देते.


Tata Tiago : टाटा मोटर्सची ही लोकप्रिय हॅचबॅक कार आहे. त्याची स्पर्धा मारुती स्विफ्टशी आहे. Tiago 1.2-लीटर रेव्होट्रॉन पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. ऑटोमॅटिक गिअरबॉक्ससह 6.55 लाख रुपयांना उपलब्ध आहे. या गिअरबॉक्ससह, तुम्हाला 20.09 kmpl पर्यंत मायलेज मिळणार आहे.
 
Maruti Baleno: मारुती सुझुकी बलेनो ही देशातील सर्वाधिक विक्री होणाऱ्या वाहनांमध्ये येते. त्याची स्पर्धा Tata Altroz, Honda Jazz, Hyundai i20 सारख्या वाहनांशी आहे. Baleno च्या ऑटोमॅटिक व्हेरियंटची किंमत 7.83 लाख रुपयांपासून सुरू होते. या गिअरबॉक्ससह बलेनोचे मायलेज 22.94 kmpमिळणार आहे.  


Nissan Magnite : हे देशातील सर्वात स्वस्त सब-कॉम्पॅक्ट एसयूव्ही वाहनांपैकी एक आहे. टाटा नेक्सॉन, किया सॉनेट आणि रेनॉल्ट चिगर सारख्या वाहनांशी स्पर्धा करते. निसान मॅग्नाइट 23 प्रकारांमध्ये उपलब्ध असून 1.0-लिटर इंजिन मिळणार आहे. यात मॅन्युअल आणि सीव्हीटी गिअरबॉक्स देण्यात आला आहे. CVT गिअरबॉक्ससह Magniteची किंमत रु. 8.91 लाख पासून सुरू होते आणि 17.7 kmpl पर्यंत मायलेज देते.