मुंबई : भारतात डिझेल कारपेक्षा पेट्रोल कारला अधिक पसंती आहे. याच महत्वाच कारण म्हणजे पेट्रोल कारही डिझेल कारपेक्षा स्वस्त आहे. तसेच डिझेल कारपेक्षा पेट्रोल कारमुळे कमी प्रदूषण होतं. तसेच आता देखील लोकं कार खरेदी करताना जास्त मायलेजचा विचार करतात. यामुळे पाहूया भारतातील सर्वाधिक मायलेज देणाऱ्या या 6 गाड्या ...


रेनो क्विड 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या कारने मार्केटमध्ये येताच धुमाकूळ घातला आहे. कमी किंमतीच्या या कारचा प्रीमियम लूक आणि सर्वाधिक इंटेरिअर, टचस्क्रीन इंफोटेनमेंट सिस्टम आणि अधिक चांगले फिचर्स दिले आहेत. या कारची किंमत सुरूवात 2.67 लाखात आहे. रेनोची ही कार 25.17 किमी/लीटर मायलेज दिली आहे. 


डॅटसन रेडिगो 


रेडिगोला सर्वात मोठी कार तुम्ही म्हणू शकत नाही. मात्र 2.81 लाख रुपयातील ही कार अफोर्ड करण अतिशय सोप आहे. डॅटसन रेडिगो 0.8 लीटर इंजिनसोबत ही कार 54 एचपीची पावर जनरेट करतात. रेनो क्विडसोबत ही कार उत्तम मायलेज देणारी ही कार आहे. 25.17 किमी/लीटर मायलेज देते. 


मारूती अल्टो 800 


मारूतीची सर्वात छोटी आणि लोकप्रिय कार अल्टो 800 भारतात आज देखील अतिशय लोकप्रिय आहे. ही कार आजही लोकप्रिय आहे याच महत्वाच कारण म्हणजे मायलेज आणि कमी किंमत. या कारची इंजिन 796 सीसी असून 48 एचपीची टार्क जनेरेट करतात. ही कार आतापर्यंत सर्वाधिक मायलेज देणारी कार असून ती तिसऱ्या क्रमांकावर आहे. याचा मायलेज 24.7 किमी/लीटर आहे. 


मारूती अल्टो के 10 


अल्टोनंतर मारूती कंपनीची अल्टो के 10 चा दुसरा क्रमांक येतो. या कारचं इंजिन अल्टो 800 कारपेक्षा अधिक ताकदवान आहे. 1.0 लीटरची ही कार 68 एचपी पॉवर जेनरेट करते. या कारची किंमत 3.30 लाख रुपये आहे. जी उत्तम मायलेजच्या समोर अतिशय कमी आहे. मारूतीच्या या कारचं मायलेज 24.07 किमी/लीटर आहे. यामुळे ही कार चौथ्या क्रमांकावर आहे. 


टाटा टियागो 


टाटाच्या या कारची मायलेज सर्वाधिक असून ही कार पाचव्या क्रमाकांवर आहे. टियागो ही कार अतिशय स्टायलिश कार आहे. कारचे हे फीचर्स हॅचबॅक कारपेक्षा अधिक आहेत. या कारमध्ये 85 एचपी, 1.2 लीटर इंजिन दिलं आहे. कारच्या सेगमेंटमध्ये हे सर्वाधिक कमी आहे. कारची मायलेजबाबत बोलायचं झालं तर 23.84 किमी/लीटर मायलेजमध्ये ही सर्वात शानदार कार आहे. 


मारूती सेलेरियो 


मारूतीची कार सेलेरियो ही हॅचबॅक कारमध्ये वेगळी कार आहे. या कारची किंमत 4 लाख रुपये आहे. या कारच इंजिन 68 एचपी, 1.0 लीटर तीन सिलेंडरचं आहे. जे अल्टो के 10 सारखे आहे. कारच्या मायलेजमध्ये 23.1 किमी/लीटर आहे.