मुंबई : गुगल सर्च इंजिन हा एक माहितीचा स्त्रोत आहे. कोणत्याही गोष्टीबाबत तुम्हाला माहीती हवी असेल तर तुम्हाला गुगलला सर्च करून मिळवता येईल. काही लोक अनेक प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी सर्च करतात तर काही लोक खुपच विचित्र गोष्टी सर्च करतात. आज आम्ही तूम्हाला याचं सर्वाधिक सर्च केलेल्या गोष्टींची माहिती देणार आहे. गुगलवर सर्वाधिक सर्च केलेल्या या गोष्टी पाहून तूम्हीही चक्रावाल.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मांजरीबाबत या गोष्टी सर्च 


'माझी मांजर मला मारायची आहे' असा गुगल सर्च खुप नागरीक करतायत. अनेकांना असे वाटते की त्यांची पाळीव मांजर खूप धोकादायक आहे आणि तिला त्यांना मारायचे आहे. याबाबत ते गुगलवर सर्च करतात. तसेच अनेक युझर्स, चुकून त्यांची मांजर ड्रायरमध्ये मारली आहे, आता त्यांनी काय करावे? असे सर्च करतात.  किंबहुना, मांजरी घराच्या ड्रायरमध्ये झोपतात त्यामुळे असे अपघात घडतात.


प्राण्यांबद्दल विचित्र सर्च


अनेक युझर्स कारमध्ये एक हरण आहे आणि त्यांनी त्याबद्दल काय करावे, असे सर्च करतात. अनेक लोक पाळीव कुत्रे पाळतात. यातील काही प्राणी प्रेमी गुगल सर्चमध्ये कुत्र्यांना विग लावावे की नाही, असे सर्च करतात. तर  'एखाद्या डॉल्फिनला माझ्यासोबत सेक्स करायचा असेल तर मी काय करू?', असा एक विचित्र गुगल सर्चही आहे.


युझर्स स्वत:बद्दल काय सर्च करतात? 
अनेक य़ुझर्स गुगलला विचारतात की ते रक्त शोषणारे म्हणजे व्हॅम्पायर आहेत का?, तसेच असा काही जादूचा मार्ग आहे की ज्याद्वारे ते वास्तविक जलपरी बनू शकतात असाही सर्च केला जात आहे.