नवी दिल्ली : टोयोटाने ऑटो एक्सपो 2018 मध्ये आपली नवी कार यारिस ची एक झलक दाखवली होती. तेव्हापासून ही कार खूपच चर्चेत आहे. बाजारात सध्या असलेल्या कारला टोयोटा यारिस चांगलीच टक्कर देईल असं बोललं जात आहे.


25 एप्रिलपासून बूकिंग


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

टोयोटा कंपनी आपली नवी कार यारिस लॉन्च करण्याची तयारी करत आहे. मात्र, ही कार लॉन्च होण्यापूर्वीच फिचर्स लीक झाले आहेत. या कारची अधिकृतरित्या बूकिंग 25 एप्रिल पासून सुरु होणार असल्याचं कंपनीने म्हटलं आहे.


काय आहेत फिचर्स?


यारिस ही कार जे, जी, व्ही आणि व्हीएक्स व्हेरिएंट्समध्ये लॉन्च केली जाणार आहे. कारमध्ये 7 स्पीड सीव्हीटी गेअरबॉक्ससोबत 6 स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशनही देण्यात येणार आहे. यासोबतच कारमध्ये हॅलोजन हेडलॅम्प्ससोबत प्रोजेक्टर्स, पावर मिरर्स, एलसीडी इंफोटेनमेंट डिस्प्ले देण्यात आला आहे. 


टोयोटा यारिसचं टॉप मॉडेल व्हीएक्स मध्ये एलईडी डेटाइम रनिंग लाईट्स, 7.0 इंच AVN इंन्फोटेन्मेंट सिस्टमसोबत 6 स्पिकर्स, लेटर सिट्स, टायर प्रेशर मॉनिटरिंग आणि रियर सनशेड देण्यात आले आहेत.


यारिसची रंगली जोरदार चर्चा


कंपनीतर्फे लवकरच ही कार भारतीय बाजारपेठेत लॉन्च केली जाणार आहे. तसेच असाही दावा करण्यात येत आहे की, ही कार लॉन्च झाल्यानंतर सबकॉम्पॅक्ट सेगमेंटमध्ये धुमाकूळ घालेल.


कारची किंमत किंती?


नव्या टोयोटा सिडेनमध्ये रूफ माऊंटेड रिअर एसी वेंट्स, पॉवर अ‍ॅडजेस्टेबल फ्रन्ट सीट. सात एअरबॅग्स आणि फ्रन्ट पार्किंग सेंसर प्रमुख आहेत. या नव्या कारची किंमत भारतात १० ते १२ लाख रूपये असण्याचा अंदाज व्यक्त करण्यात येतोय.